सौजन्य फोटो - AI Gemini   Senior Citizen Cyber Fraud
क्राईम

८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्ट अन् ४५.२० लाखांचा गंडा! ईडी, आरबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाची बनावट पत्रे दाखवून सायबर लुट!

आधार कार्डचा गैरवापर अन् कुलाबा पोलीस ठाण्यात २० तक्रारींची भीती! ईडी, आरबीआय व सर्वोच्च न्यायालयाची बनावट पत्रे दाखवत ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून ४५ लाख २० हजार उकळले; कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल.

Sanofar Nayakawadi
  • ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ४५.२० लाखांची सायबर फसवणूक

  • खोटे अधिकारी व बनावट पत्रे दाखवून, मुलाच्या जीविताची धमकी देत पैसे उकळले

  • कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू

पुणे: कोथरूड येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या दुपारच्या वेळी फोनची रिंग वाजली. त्यांनी हा कॉल उचलला आणि पुढे असं काही घडलं, ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. आर्थिक गैरव्यवहारात त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यानंतर भीती दाखवत सायबर चोरट्यांनी ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ४५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे पोलीस निरीक्षक कारोटी पुढील तपास करत आहेत.

नेमका कसा रचला फसवणुकीचा डाव?

२० नोव्हेंबर रोजी दुपारी तक्रारदारांना अनोळखी क्रमांकावरून फोन करून 'डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया'तून बोलत असल्याचे सांगण्यात आले. आधार कार्डचा गैरवापर होऊन कुलाबा पोलीस ठाण्यात २० तक्रारी दाखल असल्याची भीती घालण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल करत आपण कुलाबा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी संदीप राव बोलत असल्याचे भासवण्यात आले.

बनावट पत्रे आणि जीविताची धमकी देत रक्कम उकळली

मोठ्या आर्थिक गैरव्यवहारात नाव आल्याचा दावा करत कुटुंबीयांची, मुलाच्या नोकरीची, घरातील सोन्याची आणि मुदत ठेवींची माहिती तसेच फोटो मागवून घेण्यात आले. विश्वास संपादनासाठी ईडी (सक्तवसुली संचालनालय), आरबीआय, सर्वोच्च न्यायालय आणि भारत सरकारच्या लेटरहेडवरील बनावट पत्रे पाठवण्यात आली. कोणाला सांगितल्यास मुलाच्या नोकरीवर आणि जीवितावर बेतेल, अशी धमकीही देण्यात आली. बँक खात्याच्या पडताळणीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला मुदत ठेवी मोडून त्यातील रक्कम तसेच खात्यातील पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले.

कोथरूडमधील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची किती रुपयांची फसवणूक झाली?

सायबर चोरट्यांनी भीती दाखवून आणि बँक खात्याच्या पडताळणीच्या नावाखाली ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ४५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली.

सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला कशाची भीती दाखवली?

आधार कार्डचा गैरवापर होऊन कुलाबा पोलीस ठाण्यात २० तक्रारी दाखल असल्याची तसेच मोठ्या आर्थिक गैरव्यवहारात नाव आल्याची भीती दाखवत ईडी, आरबीआय, सर्वोच्च न्यायालय आणि भारत सरकारची बनावट पत्रे पाठवून मुलाच्या नोकरी व जीविताची धमकी दिली.

या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे पोलीस निरीक्षक कारोटी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Pakistan Blasphemy Law : पाकिस्तानमधील ख्रिस्ती समाजावर नवे संकट! ईशनिंदा कायद्यातील शिक्षा वाढवण्याचा ठराव मंजूर; नेमकं प्रकरण काय?

Old Monk High Court Order : ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लास ABC ज्यूस, त्वचा केसांसोबतच आरोग्याला होतील भरमसाट फायदे

अकोल्यात कॉमन ब्रँडिंगअभावी 260 केंद्रांना फटका; सेवा केंद्रांच्या मनमानीला बसणार चाप

Nashik Crime News: प्रेमाच्या वादातून थेट हत्येचा प्रयत्न! नाशिकरोडमध्ये संशयित पोलिसांच्या जाळ्यात