सौजन्य फोटो - सोशल मिडीया  Ganja Seized
क्राईम

ओडिशातून तब्बल १ कोटी २५ लाखांचा गांजा पुण्यात आणण्याचा डाव फसला! स्टेट बँक कॉलनीत पोलिसांनी रचला सापळा!

कुंजीर लॉन्सजवळ पोलिसांचा इशारा डावलून पळालेल्या कारचा पाठलाग! शिरूरमध्ये २५० किलो गांजासह दोघांना अटक; १ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त. Pune Shirur Ganja Seized 250 Kg, Anti Narcotics Squad Pune Action, White Mahindra XUV Chase Shirur, Samir Raut Ajay Mohite Arrest, 1.50 Crore Ganja Seized Pune

Sanofar Nayakawadi
  • पळणाऱ्या एक्सयूव्हीचा पाठलाग करून शिरूरमध्ये कार अडवली

  • ५० किलो गांजासह दोघांना अटक करत १ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

  • ओडिशातून पुण्यात गांजा वितरित होण्यापूर्वीच अमली पदार्थविरोधी पथकाने केली कारवाई

पुणे: कुंजीर लॉन्स परिसरातून पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्सयूव्ही भरधाव वेगाने येताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी हाताने इशारा करून कार थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत सोलापूरच्या दिशेने वेगाने पळ काढला. अखेर ओडिशातून तब्बल २५० किलो गांजा विक्रीसाठी पुण्यात आणणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून जेरबंद केलं आहे. शहरात गांजाचा साठा वितरित होण्यापूर्वीच अमली पदार्थविरोधी पथक दोनने शिरूरमध्ये ही मोठी कारवाई केली.

पोलिसांचा इशारा धुडकावला अन् थरारक पाठलाग सुरू झाला

अमली पदार्थविरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक जीवन माने बुधवारी पथकासह लोणी काळभोर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कुंजीर लॉन्स परिसरातून पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्सयूव्ही भरधाव वेगाने येताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी हाताने इशारा करून कार थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत सोलापूरच्या दिशेने वेगाने पळ काढला. हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला.

शिरूरमध्ये कार अडवली; दोघे आरोपी गजाआड

संशयित कार शिरूर शहरात गेल्यानंतर पोलिसांनी स्टेट बँक कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत ती अडवली. झडती घेतली असता कारमध्ये तब्बल २५० किलो गांजा आढळून आला. समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोल, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

१ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत १ कोटी २५ लाख रुपये किमतीचा गांजा आणि वाहन तसेच मोबाईलसह एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांजाचा साठा कोठून आणि कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पुणे पोलिसांनी किती किलो गांजा आणि किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे?

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथक दोनने २५० किलो गांजा (किंमत १ कोटी २५ लाख रुपये) तसेच कार व मोबाईलसह एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे काय आहेत?

समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, दोघेही रा. ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी ही कारवाई नेमकी कोठे आणि कशी केली?

लोणी काळभोरजवळील कुंजीर लॉन्स परिसरात पोलिसांनी थांबण्याचा इशारा देऊनही पळ काढणाऱ्या पांढऱ्या महिंद्रा एक्सयूव्हीचा पाठलाग करून शिरूरमधील स्टेट बँक कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत कार अडवून ही कारवाई करण्यात आली.

भारतात सुरू होणार Apple चे सातवे अधिकृत रिटेल स्टोअर, कंपनीने केली या शहराची निवड

इन्स्टाग्रामवर मैत्री, गणपती दर्शनाच्या बहाण्याने तरुणीला बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Alpana art: अल्पना आर्टचा वाढतोय ट्रेंड! जाणून घ्या बंगालच्या या पारंपरिक कलेचे महत्त्व आणि खास वैशिष्ट्ये

अमरावती विमानतळावरून रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा; आता केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

Israel : इस्रायलमध्ये सत्तांतराची नांदी! आयझेनकोट आणि गोलान यांच्यात युती; अरब पक्ष 'रा'आम'ही सरकारमध्ये सामील होणार?