शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार व कोयत्याने हल्ला
२०२५ मधील शुभम चव्हाण हत्येचा बदला
सख्खा भाऊ अक्षय चव्हाण याने रचला कट
Mandar Kiwale Assisination Case: पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या जवळ भर दुपारी बुधवारी (25 नोव्हेंबर) सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करत हल्ला केला. न्यायालयाच्या परिसररातच हा हल्ला झाल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे. या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (35) नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु केले. (Pune Firing Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी मंदार किवळे याच्यावर गोळीबार केला. पण नेम चुकला आणि मंदार गोळी लागली नाही. पण त्याचवेळी मंदार किवळे सावध झाला. पण त्याचवेळी हल्लेखोरांनी कोयत्याने मंदारवर सपासप वार केले. हे वार इतके तीक्ष्ण होते की मंदारचे दोन्ही तळाहात शरीरापासून वेगळे झाले होते. कोयत्याने हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळे याला स्थानिकांनी नागरिकांनी ससून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण या हल्ल्यानंतर आणखी एक घटना समोर आली आहे.
एक वर्षांपूर्वी झालेल्या शुभम चव्हाणच्या हल्ल्याचा बदला? (Pune Shubham Chavan Case)
अवघ्या वर्षभरापूर्वी 2025 मध्ये कात्रजमध्ये शुभम चव्हाण (Shubham Chavan Case) या तरुणाचीही हत्या करण्यात आली होती. शुभम चव्हाण हा कात्रजमधील संतोषनगर परिसरातील रहिवासी होता आणि त्याचे एक रेस्टॉरंटदेखील होते. मालमत्तेच्या वादातून शुभम चव्हाणला लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी चार जणांना अटक करण्यात आली होती.
शुभम चव्हाण आणि अमर साकोरे यांच्यात घराशेजारी असलेल्या जमिनीवरून काही महिन्यांपासून वाद सुरू होते. त्याच वादातून चार जणांनी लाकडी बांबु, लाठ्यांनी मारहाण करुन शुभमची हत्या केली. त्याची हत्या करुन फरार झाले. पोलिसांनी तपास करुन चौघांनाही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून अटक केली. चौकशीत चौघांनीही शुभमच्या हत्येची कबुली दिली. पण दुसरीकडे शुभमचा भाऊ आणि त्याचे मित्रांनी मात्र शुभमच्या हत्येचा बदला घेण्याची शपथच घेतली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेणार असल्याचा निर्धार त्याच्या भावाने केला होता. शुभमच्या हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे न्यायालयात हजर राहण्यासाठी पोहचला असता न्यायालयाच्या बाहेरच काही तरुणांनी त्याच्यावर सपासप वार केले.
शुभम चव्हाणच्या मृत्यूला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला होता. पण त्याच्या सहकाऱ्यांनी प्लॅन आधीच बनवायला सुरुवात केली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या मारेकऱ्यांना संपवण्याचा कट रचण्यात आला. या प्रकरणतला आरोपी मंदार किवळे चार ते पाच दिवसांपूर्वी जामीनावर तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी किवळेच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. बुधवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यालायात आरोपी किवळे जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार आरोपी मंदार किवळे न्यायलयाच्या कामकाजासाठी दाखल झाला असता आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच किवळेच्या हल्ल्याचा संपूर्ण कट रचला. अक्षय चव्हाण याने या हल्ल्याची सुपारी इतर आरोपींना दिली होती. त्यानुसार न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर झालेला जीवघेणा हल्ला बदल्याच्या भावनेनं करण्यात आली. अक्षय चव्हाणने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून कट रचला होता. असेही पोलिसांनी म्हटलं आहे.
शिवाजीनगर न्यायालयाबाहेर कोणावर आणि कसा हल्ला झाला?
शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेला आरोपी मंदार किवळे बुधवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहण्यासाठी आला असता, दबा धरून बसलेल्या तरुणांनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले.
मंदार किवळेवरील हल्ल्यामागे नेमके कोणते कारण आहे?
२०२५ मध्ये कात्रजमधील संतोषनगर येथे जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण या तरुणाची हत्या करण्यात आली होती; त्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या हल्ल्याचा कट कोणी रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे?
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मृत शुभम चव्हाण याचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच १२ ते १५ तरुणांना एकत्र करून आणि सुपारी देऊन मंदार किवळेवर हल्ल्याचा संपूर्ण कट रचला होता.