70 हजार रुपयांच्या कर्जाची केली 3.80 लाखांची वसूली 70 हजार रुपयांच्या कर्जाची केली 3.80 लाखांची वसूली
क्राईम

धक्कादायक ! 70 हजार रुपयांच्या कर्जाची केली 3.80 लाखांची वसूली; सावकारी दहशतीने घेतला व्यावसायिकाचा बळी

म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मुख्य आरोपी संदीप मुकेश पाटील याचा गुन्हेगारी इतिहास तसेच भाजपच्या उपरण्यांसह वरिष्ठ नेत्यांसोबत आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत झळकणारे त्याचे फोटो समोर आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

Krupadan Awale

नाशिक : अवघ्या 70 हजार रुपयांच्या कर्जापोटी व्याजासह ३ लाख ८० हजार रुपये वसूल करूनही सुरू राहिलेल्या अमानुष छळाला आणि जीवघेण्या धमक्यांना कंटाळून मखमलाबाद परिसरातील एका सुतार व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मुख्य आरोपी संदीप मुकेश पाटील याचा गुन्हेगारी इतिहास तसेच भाजपच्या उपरण्यांसह वरिष्ठ नेत्यांसोबत आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत झळकणारे त्याचे फोटो समोर आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

कैलास ब्रिजलाल शिंदे असे मयत व्यावसायिकाचे नाव असून, ते मुळ नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील राहणारे आहेत. नवापूरमध्येच असताना सुतारकामाच्या भांडवलासाठी २०२२ शिंदे यांनी संशयित संदीप मुकेश पाटील व सुलोचना मुकेश पाटील यांच्याकडून ७० हजार रुपये व्याजाने घेतले होते. व्याजाची मोठी रक्कम देऊनही अधिक पैशांची मागणी सुरूच राहिली. यामुळे तणावात असलेल्या शिंदे यांची मानसिक स्थिती ढासळली. याची कुणकुण कुटुंबियांना लागल्याने नातेवाईकांनी मिळून ३ लाख रुपये जमवले आणि एप्रिल २०२२ मध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत व्यवहार मिटवण्यात आला; मात्र त्यानंतरही उरलेल्या व्याजासाठी भिशी व रोखीच्या नावाखाली तगादा लावण्यात आला.

पैशांसाठी उशीर झाल्यास रस्त्यात अडवून शिवीगाळ करणे, 'बेत पाहतो' व 'गेम करतो' अशा धमक्या देणे, सासूसासऱ्यांची गच्ची पकडून त्रास देणे असे प्रकार सुरू होते. या छळाला कंटाळून २०२२ च्या अखेरीस हे कुटुंब दोन मुलांसह नाशिकला आले आणि मखमलाबाद परिसरातील जुईनगरमधील अष्टगंध सोसायटीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. येथेही शिंदे यांनी सुतारकाम सुरू केले; मात्र, व्यवसायात मंदी आल्यानंतर पुन्हा फोनवरून धमक्यांचे सत्र सुरु होते.

राजकीय व पोलिस वरदहस्ताची चर्चा

तपासादरम्यान सावकारी शोषणाची माहिती समोर आल्यानंतर पत्नी योगीता शिंदे यांच्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर रोजी रात्री म्हसरूळ पोलीस ठाण्यात संदीप पाटील व सुलोचना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आला. संदीप पाटील याच्यावर २०१५, २०१७ आणि २०१८ मध्ये विविध गंभीर कलमांखाली गुन्हे नोंद असल्याची नोंद आहे. तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे दिसून येते. वरिष्ठ नेत्यांसोबत तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबत विविध कार्यक्रमांत दिसून येतो. त्यामुळे या सावकारी प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक धीरज कौतिक गावरे अधिक तपास करत आहेत.

'काळजी घे...' म्हणत आत्महत्या

ऑक्टोबरमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये ५ हजार ६११ लाभार्थी अंत्योदय अन्न योजनेतील, तर ४४ हजार ९५ लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजनेतील होते. तर २२ नोव्हेंबरपर्यंत अनुक्रमे ४ हजार ६९० आणि ३५ हजार ४१२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. नोव्हेंबर महिन्याचे अद्याप आठ दिवस शिल्लक असल्याने लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

IND vs NZ: पहिला दिवस रोमांचक! 110/4 वरून 246/5 पर्यंत, भारतीय संघाला सहाव्या विकेटसाठी आस

New Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत नव्या चित्रपटाची एन्ट्री! ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’च्या पोस्टरने वेधले लक्ष

Mumbai Ahmedabad Highway : उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलाला भेगा! कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही दर्जावर प्रश्नचिन्ह; कारवाईची मागणी

ठाकुर्ली स्थानकावर खळबळ! सिगारेट-बिडी ओढण्यास मनाई केल्याने प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला.

Health tips: तुमच्या घरातही येतेय का अस्वच्छ पाणी? पाणी स्वच्छ करण्यासाठी करा हे ८ सोपे उपाय!