Pune Court Attack Pune Court Attack
क्राईम

मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मंदार किवळे हल्ला प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने सहा आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Dnyaneshwar more
  • मंदार किवळे हल्ला प्रकरणाचा तपास वेगात

  • हल्ल्यामागे मोठ्या कटकारस्थानाचा संशय

  • सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेज पोलिसांच्या हाती

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात चर्चेत आलेल्या मंदार किवळे हल्ला प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने सहा आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्यामागे मोठे कटकारस्थान असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास अधिक महत्त्वाचा ठरला आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. डी. पंजवानी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. पोलिसांनी आरोपींच्या अधिक चौकशीसाठी आणि हल्ल्याशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईलमध्ये हल्ल्याचे फुटेज उपलब्ध आहे. हल्ल्यात वापरण्यात आलेले कोयते आणि पिस्तूल कुठून आणण्यात आले, याचा तपास अद्याप बाकी आहे. याशिवाय या प्रकरणातील अन्य पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले.

दरम्यान, पीडित पक्षाच्या वकिलांनी या हल्ल्यामागे मोठे कटकारस्थान असण्याची शक्यता व्यक्त केली. दोन आरोपींच्या हातातील शस्त्रे अद्याप जप्त झालेली नाहीत. तसेच काही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी सखोल चौकशीची गरज असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला. केवळ एकाच ठिकाणी राहत असल्याच्या कारणावरून काही जणांना आरोपी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, हल्ल्यात वापरलेली शस्त्रे आणि हल्ल्यामागील नेमके कारण तपासातून काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंदार किवळे हल्ला प्रकरणातील आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली?

न्यायालयाने आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हल्ल्यात कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता?

हल्ल्यात कोयते आणि पिस्तूल वापरण्यात आल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.

पोलिसांना या प्रकरणात कोणता तपास करायचा आहे?

हल्ल्यातील शस्त्रे कुठून आणली, मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हल्ल्यामागील कटकारस्थान काय आहे, याचा तपास पोलिसांना करायचा आहे.

Black Friday 2026: दिवाळीनंतरही शॉपिंगचा धमाका! 'Black Friday' सेलची भारतीयांना का लागली भुरळ?

थंडीत गरम पाण्याची कमी पडणार नाही! 15L की 25L, कोणता Geyser तुमच्यासाठी योग्य?

IND vs NZ: Team India ला शेवट गोड करण्याची संधी! भारत-न्यूझीलंड दुसरा सामना कधी अन् कुठे? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Mumbai Terror Attack : मुंबई रक्ताने न्हाली, पण पाकिस्तानात जल्लोष? 26/11ची ती काळरात्र; 'असे' होते कसाबच्या मुंबई प्रवेशामागचे धक्कादायक सत्य

Pune Airport वर गाडीने जाताय? मग आधी 'ही' बातमी वाचाच; नियम मोडल्यास थेट...