चिपळूणमधील कोयता हल्ल्यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात चिपळूणमधील कोयता हल्ल्यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

चिपळूणमधील कोयता हल्ल्यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आणखी पाच जणांचा शोध सुरु

भरदिवसा ही घटना घडल्याने चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे. या कोयता हल्ल्यातील सात जणांपैकी दोघांना ताब्यात घेण्यास चिपळूण पोलिसांना यश आले आहे.

Krupadan Awale
  • चिपळूण शहरातील एन्रॉन पुलाखाली दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली.

  • या वादाचे रूपांतर कोयता हल्ल्यात झाले.

  • कोयत्याने सपासप वार केल्याने तिघेजण जखमी झाले.

चिपळूण : शहरातील एन्रॉन पुलाखाली दोन कुटुंबीयात हाणामारी झाली. या घटनेत कोयत्याने सपासप वार केल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. या जखमींना चिपळूण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे. या कोयता हल्ल्यातील सात जणांपैकी दोघांना ताब्यात घेण्यास चिपळूण पोलिसांना यश आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एन्रॉन पुलाखाली २ कुटुंबीय जमले होते. यावेळी दोघांकडून अन्य काहींवर कोयत्याने सपासप वार केले जात होते. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. फैजान चौगुले (वय २८), सौद चौगुले (वय २५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोयता हल्ल्यातील सात जणांपैकी दोघांना ताब्यात घेण्यास चिपळूण पोलिसांना यश आले आहे. अब्दुल शेख व अमन शेख अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अद्याप पाच जण फरार असून, पोलिस वेगाने तपास करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले. परंतु, चिपळूणमध्ये प्रथमच कोयत्याने सपासप वार करण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी उपस्थित महिलांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, हल्लेखोर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हल्ल्याच्या कारणांचा तपास सुरु

हा प्रकार कोणत्या कारणातून घडला? हे अद्याप समोर आलेले नाही. तर या घटनेची सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. अधिक तपशील समजू शकला नाही.

FAQ

1. कोयता हल्ल्याची घटना कुठे घडली?

चिपळूण शहरातील एन्रॉन पुलाखाली ही घटना घडली.

2. हाणामारी कोणामध्ये झाली?

दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

3. कोयता हल्ल्यात किती जण जखमी झाले?

या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत.

Todays Gold-Silver Price: 24 तासांत तब्बल 10 हजारांनी घसरला प्रति किलो चांदीचा भाव, सोन्याचे दरही उतरले...

Winter Food: शरीरातील प्रत्येक अवयव होईल तृप्त! हिवाळ्यात डाळ खिचडीसोबत आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

26/11 Terror Attack : मुंबईवरील हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण; समुद्रात नौदल, तटरक्षक दलाचा कडक पहारा

तुम्ही घरी नसतानाही पाळीव प्राण्याला मिळणार वेळेवर खाऊ; जाणून घ्या Smart Pet Feeder चे काम

ADV बाईकमध्ये 21-Inch Front Wheel का असते? मोठ्या चाकामागचे खास कारण!