पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू  पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू
क्राईम

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

पहाटेच्या दाट धुक्यात कामावर जाणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Dnyaneshwar more

कोरपना : पहाटेच्या दाट धुक्यात कामावर जाणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळगाव-चनई खुर्द फाट्यादरम्यान घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रमोद भाऊराव किन्नाके (२६, रा. तुळशी, ता. कोरपना), प्रणय मुके (२८, रा. निंबाळा ता. वणी जि. यवतमाळ) असे मृतकांची नावे आहेत. तर वैभव रमेश राऊत (२५, रा. तांबाडी, ता. कोरपना) असे जखमीचे नाव आहे.

तिघेही आरसीसीपीएल लाईमस्टोन माईन्स, परसोडा येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. पहाटेच्या सुमारास तिघेही (एमएच ३४ बीटी २१२०) दुचाकीने कोरपना येथून कामावर जात होते. दरम्यान, परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. अशातच विरुद्ध दिशेने राँग साईडने येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात प्रमोद भाऊराव किन्नाके याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रणय मुके याला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

तर वैभव राऊत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर चंद्रपूर येथील मानवटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतक व जखमींना कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद रहागडाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमादार व कोरपना पोलिस करीत आहेत.

धुके धोकादायक 

मागील दोन- तीन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझीम पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे धुके पडत असल्याचे चित्र पहायला मिळते. यामुळे वाहनधारकांना महामार्गावरून वाहने चालवितांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी वाहनचालकांनी सावधानता बाळगून वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

'झालं बाबा एकदाचं लग्न...' संतोष जुवेकरने दिली आनंदाची बातमी; VIDEO पाहून चाहतेही खुश

Pune Metro आता थांबणार नाय! 'या' मार्गावर दररोज ५० हजार प्रवाशांचा प्रवास

Sourav Ganguly : कुलदीप अथवा मानव कुठे आहेत? वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्यानंतर गांगुलींनी उपस्थित केला प्रश्न

Navi Mumbai News: बेलापूर न्यायालयात खळबळ! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

बॅटने नुसती हाणामारी! Kieron Pollard ने टी 20 फॉर्मटमध्ये केला 'हा' रेकॉर्ड, बटलरचे स्थान धोक्यात