File Photo : MNS 
निवडणूक

मनसेच्या सभेत महायुतीचे झेंडे; विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेच्या अखेरच्या दिवशी पोलखोल

बाळा नांदगावकर यांच्या लालबाग येथील सभेला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या सभेत मनसेसह महायुतीतील घटक पक्षांचे झेंडेही फडकताना दिसल्याने पोलखोल झाली आहे.

कृपादान आवळे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून प्रचारसभा, बाईक रॅली, घरोघरी भेटीगाठी घेण्यात आल्या होत्या. त्यात सोमवारी (दि.18) सायंकाळी निवडणुकीचा प्रचार थांबला. मात्र, सध्या चर्चा आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुतीला असलेल्या छुप्या पाठिंब्याची. कारण, शिवडी मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या लालबाग येथे झालेल्या सभेतच महायुतीचे झेंडे दिसून आले होते. त्यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे.

बाळा नांदगावकर यांच्या लालबाग येथील सभेला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या सभेत मनसेसह महायुतीतील घटक पक्षांचे झेंडेही फडकताना दिसल्याने पोलखोल झाली आहे. हा सगळा प्रकार 'फिक्सिंग'चा खेळ असल्याचे सांगत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. महायुतीत अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना पाठिंबा देण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र, शिवसेने (शिंदे गट) चे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेणार नाही, असे ठणकावून सांगितले होते.

दरम्यान, नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सरवणकरांच्या बाजूने उभे राहिले. अखेर भाजपा नेत्यांनीही अमितला पाठिंबा देण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. परंतु, नांदगावकरांबाबतचे गूढ अजूनही कायम होते. नांदगावकर यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिलेला नाही. मात्र, त्यांना पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली नाही. तसेच त्यांच्या प्रचारसभांमध्ये महायुतीचा एकही नेता दिसला नाही. मात्र, नांदगावकर यांच्या प्रचार दौऱ्यांत ते महायुतीचे उमेदवार असल्याचेही दावे करण्यात आले.

महायुतीच्या झेंड्यांनी केलं सर्वकाही उघड

सोमवारी राज ठाकरे यांच्या सभेत फडकणाऱ्या महायुतीच्या झेंड्यांनी सर्व काही उघड केले. या सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला होता.

अल निनोचा धोका, दुष्काळाचे संकट! बदलत्या हवामानानुसार शेतीचे नियोजन करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधवांचे आवाहन

शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट! महामार्गावर गस्त अन् विशेष उपाययोजना, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन

Bopdeo Ghat Accident प्रकरणात मोठी बातमी; चालकाला कोर्टाने थेट...; वाचा सविस्तर

Kho Kho Championship : चार गुणांनी हुकले सुवर्ण! कर्नाटककडून महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव