स्काउटने गुल्लूसमोर केला लव गिलबद्दल मोठा खुलासा (फोटो सौजन्य-सोशल मीडिया) 
Entertainment

Bigg Boss 20 : स्काउटने लव गिलबद्दल गुल्लूसमोर केला धक्कादायक खुलासा, बिग बॉस २० चा नवा प्रोमो चर्चेत

Bigg Boss 20 :‘बिग बॉस २०’च्या नव्या प्रोमोमध्ये स्काउट ओपीने गुल्लूसमोर लव गिलबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या मैत्रीतील दुराव्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

अमृता यादव

Bigg Boss 20 : सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस २०’ सध्या स्पर्धकांमधील वाद आणि भांडणांमुळे चर्चेत आहे. शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये जोरदार वाद झाले. अशातच निर्मात्यांनी शोचा एक नवा प्रोमो रिलीज केला असून, यामध्ये स्काउट ओपी गुल्लूशी बोलताना दिसत आहे. या संभाषणात स्काउटने लव गिलसोबतच्या मैत्रीबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.

लव गिलबद्दल बोलताना स्काउट ओपीने व्यक्त केला पश्चात्ताप

नव्या प्रोमोमध्ये स्काउट ओपी रात्री आपल्या बेडवर बसून गुल्लूशी संवाद साधताना दिसतो. यावेळी तो लवसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण काढतो आणि एका व्यक्तीवर खूप वेळ वाया घालवल्याची खंत व्यक्त करतो. स्काउट म्हणतो, “मी एका व्यक्तीवर खूप वेळ वाया घालवला आहे. ती माझ्या जेवणाची काळजी घ्यायची, रोज माझ्या केसांना तेल लावायची, सकाळी मला उठवायची आणि माझे अंतर्वस्त्रसुद्धा धुवायची. आमचं नातं एका बेड-हबमध्ये बदललं होतं.”

तो पुढे म्हणतो, “ती फक्त ३० सेकंद माझ्याकडे बघायची आणि मी तिच्यात पूर्णपणे हरवून जायचो. मी तिला असा दर्जा का दिला, हे मला कळत नाही. मी इतका संतापलो होतो की स्वतःचे केस कापले. आयुष्याने मला मानसिक धक्का दिला.” स्काउटचे हे बोलणे ऐकल्यानंतर गुल्लू त्याला, “तू वेडा होतास,” असे उत्तर देतो.

स्काउट आणि लवच्या मैत्रीत कसा आला दुरावा?

‘बिग बॉस २०’च्या सुरुवातीपासूनच स्काउट ओपी आणि लव गिल यांच्यात घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती. दोघेही एकमेकांना भाऊ-बहीण मानत होते. मात्र, त्यांच्या या मैत्रीवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. शोचा होस्ट सलमान खाननेही त्यांच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केले होते.

इतकेच नाही, तर स्काउट ओपीची गर्लफ्रेंड काश्वी हिनेदेखील शोमध्ये येऊन त्याला लवपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या स्काउट आणि लव एकमेकांशी बोलत नसल्याचे सांगितले जात आहे. आता स्काउटने गुल्लूसमोर केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांची मैत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रोमोचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

HMD चा बजेट फ्रेंडली धमाका! AI असिस्टेंटसह भारतात नवा स्मार्टफोन लाँच... वाचा फीचर्स

National Organ Donation Day 2026: मृत्यूनंतरही जिवंत राहण्याची संधी; जाणून घ्या 27 नोव्हेंबरच्या 'राष्ट्रीय अवयवदान दिना'चे महत्त्व

Congress Politics:काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? 24 दिवसांत महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गांवडे यांची नियुक्ती रद्द

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांनो, लक्ष द्या! रेसिंग स्पर्धेमुळे सीवूड्स-नेरुळमधील काही रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते?

येरवडा जेलच्या भिंतीआतून रचला हल्ल्याचा कट?" मंदार किवळेवरील गोळीबारात १९ वर्षांच्या अर्थव मारणेचं कनेक्शन उघड!