India Bans Pakistani Web Series (फोटो सौजन्य-सोशलमीडिया) India Bans Pakistani Web Series (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Entertainment

India Bans Pakistani Web Series: पाकिस्तानी कंटेंटला भारतात नो एन्ट्री? केंद्र सरकारचा Netflix ला कडक इशारा!

Netflix Pakistani Web Series: केंद्र सरकारने नेटफ्लिक्सच्या पाकिस्तानी वेब सीरिज 'जो बचे हैं संग समेट लो'च्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला 8 मे 2025 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

Riddhi Vanne
  • पाकिस्तानी वेब सीरिजवर भारतात बंदी

  • Netflix ला केंद्र सरकारचा कडक इशारा

  • 4 डिसेंबरला जागतिक रिलीज, भारतात मात्र नो एन्ट्री

Pakistani Content Ban in India: भारत सरकारने पाकिस्तानी वेब सीरिज 'जो बचे हैं संग समेट लो' वर बंदी घातली आहे. नेटफ्लिक्सची ही पहिलीच पाकिस्तानी ओरिजिनल वेब सीरिज आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला इशारा दिलाय आणि 8 मे 2025 रोजी काढलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचे आदेश दिलेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार, पाकिस्तानात बनवलेला कोणताही सिनेमा किंवा वेब सीरिज भारतात दाखवायला परवानगी नाही.

• मंत्रालयाला कशी मिळाली माहिती?

ही पाकिस्तानी सीरिज भारतात दाखवली जाऊ शकते, अशी माहिती नुकतीच मंत्रालयाला मिळाली होती. त्यानंतर, सरकारने नेटफ्लिक्सला जून 2025 मध्ये दिलेल्या एका आश्वासनाची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी भारतात कोणताही पाकिस्तानी कंटेंट उपलब्ध करून देणार नाही असं सांगितलं होतं.

• 4 डिसेंबरला रिलीज, पण भारतात नाही

ही वेब सीरिज 4 डिसेंबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे. ती भारतात पण रिलीज होऊ शकते, याबद्दल बऱ्याच तक्रारी आणि निवेदनं आल्यावर मंत्रालयाने हा आदेश दिलाय. सूत्रांनुसार, मंत्रालयाने नेटफ्लिक्सला 8 मे 2025 रोजी काढलेल्या सूचनांचं पालन करायला सांगितलंय. या अॅडव्हायजरीत भारतातल्या सगळ्या OTT प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल मध्यस्थांना पाकिस्तानातून येणारा कंटेंट दाखवण्यापासून थांबवायचे आदेश देण्यात आले होते.

• कोणती आहे ही सीरिज?

'जो बचे हैं संग समेट लो' ही नेटफ्लिक्सची पहिली मूळ पाकिस्तानी वेब सीरिज आहे. 4 डिसेंबरपासून ही सीरिज जगभरातल्या 191 देशांमध्ये दाखवली जाणार आहे. मात्र, ही सीरिज भारतात दाखवली जाणार नाही. या सीरिजवरून मोठा वाद निर्माण झाला आणि 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'ने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून यावर बंदी घालायची मागणी केली आहे.

• सीरिजमध्ये काय आहे? कोण आहेत कलाकार?

ही सीरिज दोन भागांत दाखवली जाईल. पहिल्या भागात 5 भाग आहेत आणि एकूण 13 भाग येण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये तीन पिढ्यांच्या सहा प्रेम कथा बघायला मिळतील. यात अहाद रझा मीर, इक्रा अझीझ, फवाद खान, माहिरा खान, हानिया आमीर, सनम सईद, हमझा अली अब्बासी, माया अली, बिलाल अश्रफ, नादिया जमील आणि समीना अहमद हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर रिलीज झालाय आणि तो भारतात बघता येऊ शकतो.

खास म्हणजे, या सीरिजच्या बनवण्यासाठी आठ वर्षांचा काळ लागलाय आणि याचं शूटिंग 200 दिवस चाललं होतं.म्हणजेच जगभरात ही सीरिज बघता येणार असली तरी भारतातल्या प्रेक्षकांना ती बघता येणार नाही, हे आता साफ झालं.

Credit Card 30 Percent Rule : Credit Card वापरताय? सावधान! लिमिट 30% च्या पुढे नेऊ नका! घसरू शकतो तुमचा CIBIL Score

माझ्या बाळाला परत आणा, मला कोणाकडून काहीच नको!" बोपदेव घाटातील अपघातात सिद्धेशचा मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा...

Trending Now : 6 महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे भाषण अन् दुसऱ्या महिला खासदाराने...; ऑस्ट्रेलियन संसदेतील भावूक Video Viral

Drought Affected Farmers Scheme : शेतीला जोडधंद्याचा आधार! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती येणार रिक्षाचे स्टेअरिंग, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

नाद करा पण कोल्हापूरचा कुठं! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले विजेतेपद; तर 'या' संघांना थेट...