Mee Sansar Mazha Rekhite: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)  
Marathi Serial

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Mee Sansar Mazha Rekhite: नवरात्रोत्सवानिमित्त सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत प्रेक्षकांना एक दमदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पिहूच्या बॅडमिंटन कोचकडून गैरवर्तन होत असल्याचे लक्षात येताच अनुप्रिया आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभी राहते.

Riddhi Vanne
  • पिहूच्या कोचकडून गैरवर्तन होत असल्याचे समजताच अनुप्रिया मुलीच्या संरक्षणासाठी अन्यायाविरुद्ध उभी राहणार.
  • आई आणि सासूकडून धैर्याने संकटांचा सामना करण्याची शिकवण मिळाल्याचे अभिनेत्रीने सांगितले.
  • मी संसार माझा रेखिते’चा विशेष भाग ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ आणि रात्री ८ वाजता सन मराठीवर प्रसारित होणार.

नवरात्रोत्सवानिमित्त सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पिहूच्या बॅडमिंटन कोचकडून तिच्याशी गैरवर्तन होत असल्याचं दिसून येत आहे. ही गोष्ट अनुप्रियाच्या लक्षात येताच ती आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याचा निर्णय घेते. Mee Sansar Mazha Rekhite:

एक आई दुर्गेचं रूप

आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी एक आई दुर्गेचं रूप धारण करत अन्यायाविरुद्ध कशी लढते, हे मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. अनुप्रिया कोचला धडा शिकवणार असली, तरी त्यानंतर तिच्यासमोर कोणती आव्हानं उभी राहणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या  प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून हा महाएपिसोड ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता सन मराठीवर प्रसारित होणार आहे.

संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली

अनुप्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणाली की, " एक आई  आपल्या मुलीच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभी असते. पण वेळ आली तर ती दुर्गेचा अवतार घ्यायला पण मागे पुढे बघत नाही. असच काहीस मालिकेत पाहायला मिळणार आहे. या महाएपिसोडसाठी आमच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. आता पर्यंत प्रेक्षकांनी अनुप्रियाची मायाळू बाजू पाहिली पण आता तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी तिची दुसरी बाजू पाहायला मिळणार आहे. "

समाजातील वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात

मालिकेव्यतिरिक्त अभिनेत्रीने स्वतःच्या आयुष्यातील नवदुर्गेबद्दल सांगताना म्हणाली की, “माझ्या आयुष्यात आई आणि सासू या दोघींचंही खूप महत्त्वाचं स्थान आहे. आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग आला तरी हार मानायची नाही, तर त्याला धैर्याने सामोरं जायचं, ही शिकवण मला दोघींकडून मिळाली. माझ्या स्वप्नांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आणि ती पूर्ण करण्यासाठी मला बळ दिलं.

प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जगायला शिकावं

नवरात्रीनिमित्त देवीकडे मनापासून एकच गोष्ट मागावीशी वाटते की, समाजातील वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात, प्रत्येकाने एकमेकांना समजून घ्यावं आणि आनंदाने जगावं. समाजात प्रेम, आपुलकी आणि सकारात्मकता वाढावी. याचबरोबर प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नये. स्वतःची ओळख निर्माण करणं आणि आपल्या आनंदाला महत्त्व देणं तितकंच गरजेचं आहे.”

फक्त 6 रुपयांत बेड गरम? Heated Blanket चा वीज वापर जाणून घ्या!

नाशिकमध्ये दुष्कळाची तीव्रता वाढली; २०१ गाव-वाड्यांना ६० टँकरने पाणीपुरवठा

Laxman Hake: 'पवार कुटुंबाचं राजकारण संपेल!' सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

रुग्णालयातही मौल्यवान दागिने सुरक्षित नाहीत? कल्याणच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला

Nagpur News : सीताबर्डी उड्डाणपूल बंद होताच नागपूरची वाहतूक कोलमडली; पर्यायी मार्गांअभावी नागरिक तासनतास कोंडीत