पाच फुटाचा बच्चन आता ओटीटीवर  अमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहता येणार
Entertainment

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ आता घरबसल्या पाहता येणार, आला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर

Paach Futacha Bachchan: आता पाच फुटाचा बच्चन हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्ही हा चित्रपट हवा तेव्हा पाहू शकता. प्रेक्षकांचा हा विकेंड नक्कीच यामुळे सॉर्ट झालाय.

दिपाली नाफडे
  • पाच फुटाचा बच्चन आता घरबसल्या पाहता येणार 

  • ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता 

  • समीक्षकांची वाहवा मिळवलेला चित्रपट 

Paach Futacha Bachchan: आपल्या वेगळ्या नावामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला पाच फुटाचा बच्चन हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला असून, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रसिक प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली होती. या विकेंडला तुम्हाला वेळ असेल तर तुमचा हा वेळ नक्कीच हा चित्रपट सत्कारणी लाऊ शकतो. तुम्हाला जर इतर काही करण्याची इच्छा नसेल तर हा चित्रपट नक्कीच तुमचं मनोरंजन करेल. 

प्रेक्षकांना अंतर्मुख कऱणारा चित्रपट

राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. एकीकडे भोंदू कीर्तनकारांची चर्चा सुरू असताना, खरा कीर्तनकार कोण आणि कीर्तनपरंपरेचा मूळ गाभा काय, याचा विचार करायला लावणारा हा चित्रपट लक्षवेधी ठरतो. समता, सामाजिक जाणीव आणि संतविचारांचा संदेश देणारा हा सिनेमा मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना अंतर्मुखही करतो. 

अप्रतिम कथा आणि संवाद 

चित्रपटातील गाणी आणि संगीत हे त्याचे आणखी एक बलस्थान आहे. एका महिला कीर्तनकाराची व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. श्रुती मधुदीप या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपटाचा तोल सांभाळला आहे. तसेच कौस्तुभ रमेश देशपांडे याची खिळवून ठेवणारी कथा आणि खुसखुशीत संवाद यासाठी प्रेक्षक खास दाद देत आहेत. अभिनेते किशोर कदम, चिन्मयी सुमीत, शशांक शेंडे, गौरी नलावडे, क्षितीश दाते असे अनेक परिचित चेहरे या चित्रपटात आहेत. त्यांच्यासोबत नवोदित कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. समतेची वाट दाखवणारा, आयुष्यातील नकारात्मक गोष्टी वजा करण्याची प्रेरणा देणारा आणि प्रेम व सहजीवनाचा अर्थ उलगडून सांगणारा हा चित्रपट कुटुंबासह पाहण्यासारखा आहे.

Konkan Tradition: सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीची प्रसिद्ध लोटांगण जत्रा; जाणून घ्या अनोखी परंपरा आणि धार्मिक महत्त्व

रात्री शोरमा खाल्ला अन् सकाळी थेट रुग्णालय गाठावं लागलं! भिवंडीत गर्भवती महिला व चिमुकल्यांसह १७ जणांना विषबाधा

Homemade Hair Oil: हिवाळ्यात केसांना द्या भरपूर पोषण! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा खास घरगुती तेल, केस होतील मऊ

Women Safety & Rights: आज महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन; जाणून घ्या २५ नोव्हेंबरचा इतिहास...

उदगीरचे तरुण झाले देवदूत! पेटत्या एसटी बसमधून ३८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले