Sapna Choudhary Divorce: (सौजन्य- सोशलमीडिया)  Sapna Choudhary Divorce: (सौजन्य- सोशलमीडिया)
Entertainment

Sapna Choudhary Divorce: जिच्या ठुमक्यांवर थिरकलं संपूर्ण हरियाणा, तिच्या संसारात काय घडलं? कोण आहे तिचा पती?

हरियाणवी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सपना चौधरीने 2020 मध्ये हरियाणवी गायक, गीतकार आणि अभिनेता वीर साहू याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, सहा वर्षांच्या संसारानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून सपनाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती एका मुलाखतीत दिली.

Riddhi Vanne

कोण आहे सपना चौधरी?

हरियाणवी डान्सर सपना चौधरी हे नाव माहिती नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. डान्समुळे फेमस झाल्यावर तिने टीव्हीवर एन्ट्री घेतली. आजही तिच्या शोमध्ये खूप गर्दी बघायला मिळते. पण सध्या ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

6 वर्षांचा संसार तुटला

लोकांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या सपना चौधरीच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं. सपना चौधरीचा 6 वर्षांचा संसार मोडलाय. कोण आहे सपना चौधरीचा नवरा? तो करतो काय? पदरात दोन मुलं असताना का मोडला त्यांचा संसार? सपना चौधरीने 2020 मध्ये वीर साहूशी लग्न केलं होतं आणि ती दोन मुलांची आई पण आहे. पण नात्यातला दुरावा घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलाय. तिने घटस्फोटासाठी अर्जही केला.

सपनाने स्वतःच दिली माहिती

सपना चौधरीने एका मुलाखतीत साफ सांगितलं की तिने घटस्फोटाचा अर्ज दिलाय. ती वीर साहूपासून वेगळी होते. तिने आपल्या जोडीदारासोबतच्या नात्यावर मोकळेपणाने बोलली आणि सांगितलं की शेवटी आता सगळं काही ठीक नाहीये आणि आता ती वेगळी होते.

नवरा वीर साहू करतो काय?

वीर साहू हा हरियाणवी गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. ते हरियाणातल्या हिसार जिल्ह्यातल्या मदनडी गावचे रहिवासी आहेत. सपना चौधरी आणि वीर साहू यांनी जानेवारी 2020 मध्ये लग्न केलं होतं. दोघांना दोन मुलं आहेत.

सपना काय म्हणाली?

NMF शी बोलताना सपना चौधरी म्हणाली की, "जोपर्यंत सगळं काही ठीक होतं तेव्हा आम्ही दोघे सोबत होतो. पण आता ठीक नाहीतर आम्ही सोबतही नाही. मी घटस्फोटाचा अर्ज दिलाय. लग्न हे दोन लोकांचं नातं असतं. ते आम्ही दोघेच चांगले समजू शकतो आणि दुसरी कोणी तिसरी व्यक्ती ते समजू शकणार नाही."

मुलांवरून टीका करणाऱ्यांना उत्तर

वैयक्तिक टीका करणाऱ्यांवरही सपना चौधरीने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, "अनेकदा लोक म्हणतात की मी माझी मुलं सोडून दिली. अरे ती माझी मुलं आहेत, मला माहिती आहे त्यांची कशी काळजी घ्यायची. मला हे सगळं शिकवलं गेलं नाही की मुलं सोडून द्या. तुम्हाला माझ्या कामावर ताशेरे ओढायचे असतील तर नक्की ओढा. पण माझ्या खाजगी आयुष्याबद्दल कोणतीही कमेंट करू नका."

घटस्फोटाचं कारण काय?

आता पहिल्यांदाच सपनाने घटस्फोटाच्या कारणाचाही हिंट दिला. तिने सांगितलं की कशी ती नात्यांमध्ये अडकून पडली होती आणि आपल्या करिअरवर लक्ष देऊ शकत नव्हती. सपना चौधरीने असंही सांगितलं की, जेव्हा ती बिग बॉसमधून बाहेर आली तेव्हा तिचं करिअर पीकवर होतं.

तेव्हाच तिनं लग्न करून संसार थाटला. पण वेळेनुसार तिला जाणवलं की ती फक्त एक चांगली आई, चांगली सून, चांगली पत्नी बनून राहिली आहे. ती स्वतःला ग्रूम करू शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. तिने असंही सांगितलं की ती नात्यांमध्ये अडकली होती.

दुसरं लग्न करणार का?

याच मुलाखतीत सपना चौधरीला दुसऱ्या लग्नाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली की, "नाही. मला असं फिरता फिरता प्रेम जमत नाही. मी खूप भावनिक व्यक्ती आहे. कोणावर प्रेम करते तर अतिशय खोलवर करते. भविष्यात जर असा कोणी मिळाला आणि त्या लायकीचा असेल तर विचार करू. सध्या मला वाटत नाही की मी दुसरं लग्न करेन."

भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक; गाडी झाली पलटी

भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार; भारत शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करणार

JEE NEET Update: कोचिंग क्लासेसना बसणार चाप! पुन्हा एकदा १२ वीच्या मार्क्सवर ठरणार विद्यार्थ्यांची रँक?

मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर Prasad Oakची Bollywoodमध्ये झेप! हिंदी सिनेमात करणार दमदार एन्ट्री; चित्रपटाचं नाव काय?

Jio चा धमाका! कंपनीने लाँच केली Happy New Year Offer... अनलिमिटेड 4G आणि 5G डेटासह मिळणार धमाकेदार फायदे