( फोटो सौजन्य- सोशल मीडिया) 
Entertainment

प्रभू रामाने हनुमानाच्या चरणांना केला स्पर्श; 'रामायण'च्या ट्रेलर लाँचदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

Ramayana Trailer Launch: 'रामायण'च्या ट्रेलर लाँचदरम्यान रणबीर कपूरने हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओल यांच्या चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला. हा भावूक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमृता यादव

रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दिल्लीत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. मात्र, या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत राहिला तो रणबीर कपूर आणि सनी देओल यांच्यातील एक भावूक क्षण.

ट्रेलर लाँचदरम्यान सनी देओल मंचावर येताच संपूर्ण टीमने त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रभू रामाची भूमिका साकारणारा रणबीर कपूर पुढे गेला आणि त्याने सनी देओल यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. रणबीरच्या या कृतीनंतर सनी देओल यांनी त्याला मिठी मारली. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

या प्रसंगावर प्रतिक्रिया देताना अनेक चाहत्यांनी, "प्रभू रामाने हनुमानाच्या चरणांना स्पर्श केल्यासारखा हा भावूक क्षण होता," अशा भावना व्यक्त केल्या. चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याने हा प्रसंग प्रेक्षकांसाठी अधिक खास ठरला.

यावेळी सनी देओल ने उपस्थितांना "सत श्री अकाल" म्हणत अभिवादन केले. 'रामायण'सारख्या महाकाव्यावर आधारित चित्रपटात काम करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे त्याने  सांगितले. तसेच, या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू असून पहिल्या भागात त्यांच्या भूमिकेचा कालावधी मर्यादित असेल, असेही त्याने  स्पष्ट केले.

'रामायण'बद्दल बोलताना सनी देओल भावूक झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर नक्कीच खरा उतरेल आणि एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Best Touring Bikes Under 5 lakhs: भारतातील 5 लाख रुपयांखालील सगळ्यात भारी टुरिंग बाईक्स! आत्ताच पाहा

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

कानाला क्लिपसारखे दिसणारे Earbuds!

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ