Zee Marathi Serial Off Air? (सौजन्य- सोशलमीडिया)  Zee Marathi Serial Off Air? (सौजन्य- सोशलमीडिया)
Entertainment

Zee Marathi Serial Off Air? लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण

झी मराठी वाहिनीवर ३० नोव्हेंबरपासून पूजा बिरारी आणि हर्षद अतकरी यांची मुख्य भूमिका असलेली 'येतेच आता मी नांदायला' ही नवी मालिका सुरू होणार आहे. रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित होणार असल्याने 'देवमाणूस' मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

Riddhi Vanne
  • झी मराठीवर नव्या मालिकेची एन्ट्री

  • 'देवमाणूस' मालिकेच्या वेळेत बदल

  • 'तुला जपणार आहे' मालिका बंद होणार?

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या अनेक नवनवीन बदल बघायला मिळतात. प्रेक्षकांच्या भेटीला नवीन मालिका येत असताना काही जुन्या मालिकांना मात्र निरोप घ्यावा लागतो. अशातच झी मराठी वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता हर्षद अतकरी यांची मुख्य भूमिका असलेली 'येतेच आता मी नांदायला' ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या मालिकेच्या आगमनामुळे कोणती जुनी मालिका बंद होणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला.

'देवमाणूस' मालिकेच्या वेळेत बदल

झी मराठीवर येत्या 30 नोव्हेंबरपासून 'येतेच आता मी नांदायला' ही नवीन मालिका सुरू होणार आहे. रात्री 10 वाजता ही मालिका दाखवली जाणार आहे. त्यामुळे यावेळेत सध्या दाखवली जाणारी 'देवमाणूस' मालिका बंद होणार, असा अंदाज प्रेक्षकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, वाहिनीने 'देवमाणूस' मालिकेच्या वेळेत बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली 'देवमाणूस' ही मालिका आता येत्या सोमवारपासून रात्री 10:30 वाजता दाखवली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे ही मालिका बंद होणार नसल्याचे स्पष्ट झालं.

'तुला जपणार आहे' मालिका घेणार निरोप ?

दरम्यान, रात्री 10:30 वाजता दाखवली जाणारी 'तुला जपणार आहे' ही मालिका आता बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेतील मीरा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे हिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना अजून हवा मिळाली आहे. महिमाने मालिकेच्या सेटवरून एक सेल्फी फोटो शेअर केलाय. या फोटोला तिने 'आज काहीतरी वेगळं वाटतंय' असे भावनिक कॅप्शन दिलं. यासोबतच तिने हार्ट आणि डोळ्यांत अश्रू असलेले इमोजी पण लावले आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाची ही पोस्ट शेअर केली असावी, असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जातो.

27 नोव्हेंबरला शेवटचा भाग ?

मिळालेल्या माहितीनुसार, 'तुला जपणार आहे' मालिकेचा शेवटचा भाग 27 नोव्हेंबर रोजी दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत मालिकेच्या कलाकारांकडून किंवा झी मराठी वाहिनीकडून अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मालिका खरोखरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की तिच्या वेळेत काही बदलणार आहे याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रश्न पडले आहेत.आता खरी गोष्ट काय आहे हे तर वाहिनीच सांगेल. पण 'तुला जपणार आहे' च्या चाहत्यांना मात्र सध्या टेन्शन आलंय. मालिका बंद होणार की वेळ बदलणार, हे बघायला सगळेच वाट बघतायत.

Sheikh Hasina : शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार? दिल्लीतून ढाक्याला जाण्यासाठी केली सरकारी विमानाची मागणी

Bisleri Success Story : 'बिसलेरी' कसा बनला भारतातील सर्वात मोठा ब्रँड? अवघ्या 4 लाखांत खरेदी केलेली कंपनी आज अब्जावधींची; काय आहे कमाल कहाणी ?

WhatsApp Tips: खासगी चॅट्सच्या प्रायव्हसीबाबत चिंता? असे सेट करा फिंगरप्रिंट लॉक, सोपी आहे प्रोसेस

Virar Papadkhind Dam : 'पापडखिंड'ची सुरक्षा वाऱ्यावर! लोकप्रतिनिधी, आयुक्तांसमोर पाण्यात छठपूजा; धरणात दुचाकी - रिक्षा धुण्याचे प्रकार वाढले

WhatsApp Web वापरणाऱ्यांनो सावधान! अनोळखी डिव्हाइसवर लॉगिन केल्यास होऊ शकते मोठे नुकसान, गृह मंत्रालयाने दिला इशारा