मॅजिस्ट्रेट कोर्टाने दीपक, रांका आणि सौरव दास यांची सुटका केली  
India

अभिजित दीपकेसह सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; कोर्टाने दिले सुटकेचे निर्देश

सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांनी सांगितले की, मॅजिस्ट्रेट कोर्टाने या तिघांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही, तर न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे.

कृपादान आवळे
  • तिघांना मॅजिस्ट्रेटसमोर केले हजर
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना रविवारी मोठा दिलासा मिळाला. दिल्ली कॅन्ट मॅजिस्ट्रेट कोर्टाने या तिघांच्या सुटकेचे आदेश दिले. दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने या तिघांना मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले. सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांनी सांगितले की, मॅजिस्ट्रेट कोर्टाने या तिघांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही, तर न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे.

रत्ना सिंह यांनी 'एक्स'वर पोस्ट केले की, त्यांनी एक वर्षासाठी शांतता भंग करू नये या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी, रत्ना सिंह यांनी माहिती दिली होती की, अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर व्हायचे होते. शनिवारी (दि.१०) दिल्ली विमानतळावरून निघण्यापूर्वी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युट्युबर ध्रुव राठीची शनिवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

एका पोलीस सूत्राने सांगितले, "लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून जर त्याने (राठीने) जंतर मंतरला जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पुन्हा अटक केली जाऊ शकते किंवा त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते."

राठीला अटक कधी झाली?

राठीला शनिवारी गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मधील त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस सूत्रांनुसार, दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणांहून ७००० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

एसआयआरशी संबंधित कथित अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना जंतर मंतरवर एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार