India

आनंदाची बातमी! खाद्यतेल, इंधन, भाज्या स्वस्त होणार, महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून तरतूद काय?

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाई कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दरम्यान, मोदी सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार आहे, ज्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होतील. तसंच, भाज्यांचे दर देखील कमी होणारयेत.

Amrut Sutar

नवी दिल्ली : देशात महागाईंन (Inflation) कळस गाठला आहे, परिणामी महागाईमुळं जनता मेटाकुटीला आली आहे. महागाईच्या आगडोंबात सामान्य लोकं होरपळून जाताहेत. पण आता एक सर्वसामान्यांसाठी दिलासादायक तसेच आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंधन, भाज्या आणि खाद्य तेल (Fuel, vegetable and edible oil) यांच्या किंमतीत घट होणार आहे. यामुळं सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकार पाऊलं उचलणार असून, यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून एक लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. (Edible oil, fuel, vegetables will be cheaper, what is the provision from Modi government to reduce inflation)

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाई कमी...

मोदी सरकारच्या काळाच महागाई गगनाला भिडली आहे. मागील 15 महिन्यांमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. आगामी काळात डिसेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे, तर एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांत यश मिळावं म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाई कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दरम्यान, मोदी सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार आहे, ज्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होतील. तसंच, भाज्यांचे दर देखील कमी होणारयेत.

महागाई कशी वाढली? 

महागाई व बेरोजगारी वाढल्यामुळं सरकारं पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसा आपल्या देशाचा इतिहास आहे. त्यामुळं ही जोखीम मोदी सरकार घेणार नाही. मागील महिन्यात महागाई 5 टक्क्यावरून साडेसात टक्क्यांपर्यंत वाढली होती. त्यामुळे या सर्व पार्शवभूमीवर मोदी सरकार सतर्क झाले आहे. गेल्या वर्षी अबकारी करात व पेट्रोल डिझेलसंदर्भात सरकारने सवलत दिली होती. आता दुसऱ्यांदा मोदी सरकार सवलत देण्याचा विचार आहे. त्यामुळं महागाई कमी होणार आहे.

यामुळं जगणं कठीण...

सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.  मागी दोन महिन्यांपासून टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळं टोमॅटोला जेवणातून वर्ज करावे लागले होते. दुसरीकडे दुधाच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. मसाल्यांच्या किमतीही भडकल्या आहेत. खाद्यपदार्थांच्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. टोमॅटोनंतर आता पुढील एक-दोन महिन्यात कांद्याचे भाव दुप्पट होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या महागाईमुळं सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पण आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं सामान्यांना दिलासा मिळणार आहे.

पुण्यानंतर नाशिकच्या महापालिकेचा फ्लेक्स लावणाऱ्यांना दणका! होर्डिंग्जवरील दादा, भाऊ, साहेब रस्त्यावर

Cheapest Gold Rate Across Indian : भारतात सर्वात स्वस्त सोनं कुठे मिळतं? या राज्यांची चर्चा; 22K, 24K वर आहेत आकर्षक ऑफर्स?

Fit India Sunday on Cycle : पुण्यात 'संडे ऑन सायकल'चा शतकमहोत्सव; 50 हजार सायकलप्रेमी सहभागी होणार

Delimitation Bill Approved : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला हिरवा कंदील; राज्यांतील जागांमध्ये ५०% वाढ

पुण्यनगरीत रंगणार Table Tennis चा थरार! 'या' देशांचे खेळाडू होणार सहभागी, विजेत्याला...