India

न्यायमूर्ती उदय लळीत होणार देशाचे नवे सरन्यायाधीश, कायदा मंत्रालयाचं परिपत्रक जारी

सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीस एन व्ही रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांची जागा न्या. उदय लळीत (Uday Lalit) घेणार आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम १२४ अंतर्गत उपकलम २ नुसार राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उदय लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.

साधना

नवी दिल्ली: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायमूर्ती उदय उमेश लळीत (Justice Uday Lalit) हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. येत्या २७ ऑगस्ट रोजी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून ते काम पाहणार आहेत. कायदा मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.

सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीस एन व्ही रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांची जागा न्या. उदय लळीत घेणार आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम १२४ अंतर्गत उपकलम २ नुसार राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उदय लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. देशाचे सरन्यायाधीश म्हणून २७ ऑगस्टपासून ते कार्यरत असतील असं कायदा मंत्रालयाच्या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील.

न्यायमूर्ती उदय लळीत हे मुळचे देवगड तालुक्यातील आहेत. गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. न्यायमूर्ती लळीत यांच्या घराण्यात वकीली पेशामध्ये अनेक जण आहेत. त्यांचे आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे.

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी