image credit-social media 
India

ग्राहकांना दिलासा! आता बिलासाठी दुकानदाराला मोबाईल नंबर देण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा नवी नियम

ग्राहकांना बिल तयार करण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर किरकोळ विक्रेत्यांना देणे बंधनकारक नाही. किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी एकाच क्रमांकाचा आग्रह धरण्यास भाग पाडले जाते.

Pravina Shirpurkar

खरेदी (Shopping) केल्यानंतर दुकानदाराने बिल भरण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर (Mobile Number) मागितला तर तुम्ही ते नाकारू शकता. खरं तर, स्कॅम मेसेज आणि कॉल्सच्या वाढत्या तक्रारी बघता, केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी एक नवा नियम लागू केला आहे. किरकोळ विक्रेत्यांना वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा देण्यासाठी ग्राहकांचे मोबाईल नंबर घेण्याचा आग्रह धरू नये असे सरकारने सांगितले आहे.

सरकारचा नियम काय?

या संदर्भात माहिती देताना ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की, “विक्रेते म्हणतात की वैयक्तिक संपर्क तपशील दिल्याशिवाय ते बिले तयार करू शकत नाहीत. मात्र, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार हा चुकीचा मार्ग असून माहिती गोळा करण्यामागे कोणतेही ठोस तर्क नाही. ते पुढे म्हणाले की, आम्हाला ग्राहकांच्या गोपनीयतेची काळजी आहे. रिटेल इंडस्ट्री आणि इंडस्ट्री चेंबर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि FICCI यांना ग्राहकांच्या हितासाठी या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक सल्लागार जारी करण्यात आला आहे.

ग्राहकांनी केली होती तक्रारी

ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर ही सूचना देण्यात आली आहे. रोहित कुमार सिंग म्हणाले की, ग्राहकाने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला तर, अनेक किरकोळ विक्रेते सेवा देत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे,

मात्र, भारतातील ग्राहकांना बिल बनवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना त्यांचा मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही. मात्र, किरकोळ विक्रेते व्यवहार पूर्ण करण्यासाठी एकाच क्रमांकाचा आग्रह धरत असल्याने ग्राहकांना वेठीस धरले जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

Thane District Sports Complex : ठाणे जिल्ह्यात विविध खेळांसाठी क्रीडा संकुले उभारणार; खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती

Aadhaar Mobile Number Update : आधार केंद्रावर जाण्याचे टेन्शन नाही! फक्त 75 रुपयांत घरबसल्या लिंक करा नवीन मोबाइल नंबर

‘शिक्षणाचे माहेरघर हे गुन्हेगारांचे आवडते घर झाले...’; रोहित पवारांचा घणाघात

Gold Silver Price Crash : नोव्हेंबरमध्ये सोने-चांदी कोसळले! किमती आणखी खाली येणार का?

World News : चीनला प्रगत चिप्सपासून दूर ठेवणे अमेरिकेलाच पडणार महागात? तंत्रज्ञान निर्बंधांवर नव्याने चर्चा