पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! Photo Credit - X) 
India

Putin Visit To India: पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! पंतप्रधान मोदींसोबतच्या 'त्या' व्हिडिओमुळे चर्चेला उधान

Putin In India: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दिल्लीत आले, तिथे पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. ज्या गाडीतून पुतिन विमानतळावरून निघाले त्या गाडीचे एक खास समोर आले आहे.

नितिन कुऱ्हे
  • पुतिन यांचा दिल्ली दौरा
  • मात्र चर्चा मुंबईची!
  • मोदी-पुतिन उद्या द्विपक्षीय चर्चा करणार

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज (गुरुवार) भारतात दाखल झाले. दिल्लीच्या पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुतिन यांची गळाभेट घेऊन त्यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष पुतिन हे ५ डिसेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २३ वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद घेणार आहेत.

'मुंबई कनेक्शन' समोर

स्वागत समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पालम टेक्निकल एअरपोर्टवरून एकाच कारमध्ये बसून निघाले. यावेळी, दिल्लीत दाखल झालेल्या पुतिन यांच्या प्रवासातून एक खास 'मुंबई कनेक्शन' समोर आले, ज्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई पासिंगच्या कारमध्ये पुतिन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिल्लीच्या पालम एअरपोर्टवरून ज्या कारमध्ये बसून निघाले, ती कार मुंबई पासिंगची (Mumbai Passing) होती. त्या कारची नंबर प्लेट MH 01 EN 5795 अशी होती.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांचे रात्रीचे भोजन (डिनर) झाले. पुतिन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी आधीच पालम एअरपोर्टवर उपस्थित होते. पुतिन पोहोचताच मोदींनी त्यांचे अतिशय उत्साहाने स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून थेट पंतप्रधान निवासस्थानाकडे रवाना झाले.

मोदी आणि पुतिन यांनी एकाच गाडीने का केला प्रवास?

संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रशियन राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा खूप कडक आहे. तरीही, पुतिन स्वतःची गाडी सोडून पंतप्रधान मोदींच्या गाडीतून निघून गेले. यावरून रशियन राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींवर किती विश्वास आहे हे दिसून येते. असे म्हटले जाते की रशियन राष्ट्राध्यक्ष सध्या अनेक देशांसाठी नंबर वन टार्गेट आहेत. तरीही, पुतिन स्वतःची गाडी आणि सुरक्षा सोडून पंतप्रधान मोदींच्या गाडीत बसले.

पुतिन यांची भारत यात्रा का महत्त्वाची?

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा दौरा भारत-रशिया धोरणात्मक संबंधांच्या २५ व्या वर्षगांठनिमित्त होत आहे. सन २००० मध्ये पुतिन आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी करून या संबंधांची मजबूत पायाभरणी केली होती.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक