(फोटो सौजन्य: Pinterest) 
लाइफ स्टाइल

Bakri Eid: बकरी ईदनिमित्त घरी मटण कोरमा बनवायला विसरू नका, मटण आणि मसाल्यांचा अनोखा संगम; याची चव तोंडाला पाणी आणेल

Mutton Korma Recipe: ईद सणानिमित्त चविष्ट मेजवानीचा बेत आखला जातो. या मेजवानीतील एक लोकप्रिय आणि चविष्ट असा पदार्थ म्हणजे मटण कोरमा . आज आम्ही तुमच्यासोबत मटण कोरमाची पारंपरिक रेसिपी शेअर करत आहोत.

नुपूर भगत

बकरी ईद हा इस्लाम धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा दिवस मुस्लिमांमध्ये मोठ्या उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबासह एक खास मेजवानीचे आयोजन केले जाते ज्यात अधिकतर मांसाहारी पदार्थ सर्व्ह केले जातात. असे अनेक पदार्थ आहेत जे ईदच्या दिवशी आवर्जून खाल्ले आणि बनवले जातात आणि यातीलच एक म्हणजे मटण कोरमा.

मटण कोरमा ही एक अतिशय चविष्ट आणि समृद्ध ग्रेव्ही असलेली पारंपरिक डिश आहे. विशेषतः ईद, लग्नसराई किंवा खास प्रसंगी बनवली जाते. ह्यामध्ये मसाल्यांचे प्रमाण आणि दही, शेंगदाणा-खसखस यांचं मिश्रण केल्याने एक अनोखी चव निर्माण होते. मटण कोरमा हा पराठा, नान किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागतो. ईदच्या दिवशी याची मेजवानी घरातील सर्वांना खुश करेल. याची लज्जतदार चव तुमच्या मनाला अगदी मंत्रमुग्ध करेल. नॉनव्हेजप्रेमी असाल तर हा पदार्थ एकदा घरी नक्की बनवून पाहा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • मटण – ५०० ग्रॅम (स्वच्छ धुतलेले)
  • कांदे – २ मोठे (बारीक तळून ब्राऊन केलेले)
  • दही – १/२ कप
  • आले-लसूण पेस्ट – २ टेबलस्पून
  • लाल तिखट – १ टेबलस्पून
  • हळद – १/२ टीस्पून
  • धनेपूड – १ टीस्पून
  • गरम मसाला – १ टीस्पून
  • खसखस – १ टेबलस्पून (पाण्यात भिजवून वाटलेली)
  • शेंगदाणे – २ टेबलस्पून (कोरडे खमंग भाजून वाटलेले)
  • तेल – ४ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी

कृती

  • मटण कोरमा तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून कांदे तळून घ्या. कांदे खरपूस ब्राऊन रंगाचे झाले की त्यात आले-लसूण पेस्ट टाका
  • त्यात मटणाचे तुकडे टाकून ८-१० मिनिटं चांगलं परतून घ्या, जोपर्यंत मटणचा रंग बदलेल
  • आता त्यात हळद, तिखट, धनेपूड, मीठ आणि दही घालून मिश्रण नीट ढवळा
  • मिश्रणात खसखस व शेंगदाण्याचं वाटण टाका आणि पुन्हा चांगलं परतून घ्या
  • किंचित पाणी घालून झाकण ठेवून मटण शिजू द्या. मटण पूर्ण शिजायला साधारण ३०-४० मिनिटं लागतात
  • शेवटी गरम मसाला टाकून मिक्स करा. थोडी घट्ट ग्रेव्ही हवी असल्यास पाणी कमी वापरा
  • तयार झालेलं मटण कोरमा गरम गरम पराठा, नान किंवा भातासोबत सर्व्ह कर
  • वरून कोथिंबीर घालून पदार्थाला छान सजवा
  • अधिक रिच चवसाठी तुम्ही थोडं काजू पेस्टही वापरू शकता
  • अशा प्रकारे पारंपरिक मटण कोरमा चविष्ट चवीसह घरच्या घरी बनवून तयार आहे, कुटुंबासह याचा आस्वाद घ्या आणि सणाची मजा लुटा

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक