सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्याची ईच्छा होते. अशावेळी कायमच विकताचा नाश्ता आणून खाल्ला जातो. वडापाव, मिसळ, मेदूवडा इत्यादी तेलकट, तिखट पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खाल्ले जातात. पण उपाशी पोटी तेलकट, तिखट पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचा समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्वादिष्ट राजगिरा उपमा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला उपमा चवीला अतिशय टेस्टी लागतो. राजगिरा खाल्यामु्ळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे गरजेचे आहे. कारण उपाशी पोटी जास्तवेळ राहील्यामुळे शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – AI)
साहित्य:
- तेल
- मोहरी
- जिरे
- कढीपत्ता
- हिंग
- चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- आले
- कांदा
- हिरवी ढोबळी मिरची
- हळद
- लाल तिखट
- गरम मसाला
- राजगिरा
- शेंगदाणे
- मीठ
- कोथिंबीर
- लिंबाचा रस
कृती:
- स्वादिष्ट राजगिरा उपमा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरे घालून तडतडून घ्या. त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि हिंग घाला.
- भाजलेल्या मिश्रणात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले आणि कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजा.
- कांदा हलका सोनेरी झाल्यानंतर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
- मसाले भाजून झाल्यानंतर त्यात भिजवलेला राजगिरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, भाजलेले शेंणगदाण्याचा कूट घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
- सगळ्यात शेवटी कोथिंबीर व अर्ध्या लिंबाचा रस घालून मिक्स करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला स्वादिष्ट राजगिरा उपमा.