(फोटो सौजन्य: Pinterest)  
लाइफ स्टाइल

कुरकुरीत टिक्की, मऊ बन, आवडीच्या भाज्या अन् सॉस; घरी बनवा मार्केट स्टाईल टेस्टी Veg Burger

लहान-मोठे सर्वांनाच व्हेज बर्गरची चव फार आवडते. हा पाश्चिमात्य फास्टफूडचा प्रकार असला तरी देशाच्या अनेक भागात याला आवडीने खाल्ले जाते. बर्गरची रेसिपी फार सोपी आहे आणि तुम्ही हे झटपट घरीच तयार करू शकता.

नुपूर भगत

बर्गर हा पाश्चिमात्य फास्टफूडचा प्रकार असला, तरी हल्ली तो आपल्या भारतीय चवीनुसारही तयार केला जातो. व्हेज बर्गर हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे ज्यामध्ये भाज्यांची टिक्की, भाजलेल्या पावांमध्ये ठेवून त्यावर चीज, सॉस आणि काही ताज्या भाज्या घालून तयार केला जातो. हा बर्गर घरच्या घरी सहज बनवता येतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

अनेकदा आपण बाहेरून बर्गर खरेदी करतो आणि खातो मात्र ते फ्रेश असतेच असे नाही आणि यात आपले पैसे वाया जातात. अशात आज आम्ही तुमच्यासाठी व्हेज बर्गरची एक सोपी आणि सहज अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जिच्या मदतीने तुम्ही घरीच टेस्टी बर्गर तयार करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी, किटी पार्टीसाठी अथवा विकेंड स्पेशल नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • उकडलेले बटाटे – ३
  • उकडलेली मटार – ½ कप
  • किसलेले गाजर – ¼ कप
  • कॉर्न – ¼ कप (पर्यायी)
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • हिरवी मिरची आणि कोथिंबीर – १ टेबलस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • ब्रेडक्रम्ब्स – ½ कप
  • कॉर्नफ्लोअर – २ टेबलस्पून (पाणी घालून पेस्ट तयार करा)
  • तेल – तळण्यासाठी
  • बर्गर तयार करण्यासाठी:
  • बर्गर बन्स – ४
  • मेयोनीज – ४ टेबलस्पून
  • टोमॅटो सॉस – २ टेबलस्पून
  • चीज स्लाइस – ४
  • टोमॅटोचे स्लाइस – ४
  • कांद्याचे स्लाइस – ४
  • काकडी स्लाइस – ४
  • बटर– २ टेबलस्पून

कृती

  • व्हेज बर्गर बनवण्यास सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बटाटे, मटार, गाजर, आले-लसूण पेस्ट, मिरची-कोथिंबीर, तिखट, मीठ, गरम मसाला घालून चांगले मिक्स करा. त्याचे चपटे टिक्की बनवा
  • टिक्कीला प्रथम कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये घाला आणि नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये कोट करा
  • गरम तेलात हे टिक्की कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. (पर्यायी – एअर फ्राय किंवा पॅन फ्रायही करू शकता.)
  • बर्गर बन्स मधोमध कापून, थोडं बटर लावून तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडं खरपूस भाजून घ्या
  • बन्सच्या आतल्या बाजूंना मेयोनीज आणि टोमॅटो सॉस लावा, तुम्ही तुमच्या आवडीचा सॉसही यात लावू शकता
  • खालच्या बन्सवर टिक्की ठेवा, त्यावर चीज स्लाइस, टोमॅटो, कांदा व काकडीचे स्लाइस ठेवा
  • वरचा बन ठेवून हलका दाबा. गरमागरम व्हेज बर्गर खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुमच्या आवडीनुसार लेट्यूस, मस्टर्ड सॉस, किंवा चाट मसाला घालून तुम्ही तुमच्या बर्गरला तुमच्या आवडीनुसार तयार करू शकता

भारताच्या वाघिणींनी जपानला फाडून खाल्ले; 4-0 ने पराभव अन् थेट 'या' रॅंकिंगमध्ये...

फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम