(फोटो सौजन्य – Pinterest) 
फूड

यंदाच्या विकेंडला घरी बनवा कोल्हापूर स्टाईल सुक्कं मटण; पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल

Sukk Mutton Recipe: विकेंड म्हटल की नॉनव्हेज आलंच! तुम्हीही या विकेंडला काही खास बनवण्याचा विचार करत असाल कोल्हापूर स्टाईल सुक्क मटण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे

नुपूर भगत

foo तुम्हीही नाॅनव्हेज लव्हर्स असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी खास ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला या लेखात झणझणीत सुक्कं मटन कसं तयार करायचं याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही एक पारंपारीक महाराष्ट्रायीन रेसिपी आहे, जी चवीला फार अप्रतिम लागते. नाॅनव्हेज लव्हर्ससाठी सुक्कं मटण म्हणजे पर्वणीच! विकेंडला अथवा कोणत्या खास प्रसंगी या पदार्थाची मेजवाणी खास करुन बनवली जाते. आम्ही तुम्हाला या लेखात सुक्कं मटणंची एक फार सोपी आणि सहज रेसिपी सांगणार आहोत.

या रेसिपीच्या मदतीने तुम्ही गावरान स्टाईल सुक्कं मटन घरीच तयार करु शकता. सुक्कं मटण हे मटण, मसाला आणि कांद्याच्या वाटणापासून तयार केले जाते. याची चव अप्रतिम लागते आणि खवय्यांना तर ती फारच आवडते. तुम्ही हे सुक्कं मटन भाकरी अथवा भातासोबत खाऊ शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • 1/2 किलो मटण
  • 4 कांदे
  • 2 गड्डे लसुण
  • 1 कप खोबरे
  • 3/4 कप तेल
  • 2 चमचे आले-लसूण पेस्ट
  • 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
  • 1 चमचा काश्मिरी लाल तिखट

कृती

  • कोल्हापुरी स्टाईल सुक्क चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम मटण स्वछ धुवून घ्या
  • यानंतर त्यात हळद, मीठ आणि धने पावडर टाकून काही तास मॅरीनेट करा
  • आता गॅसवर तेल टाका आणि यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घाला
  • मटण मॅरीनेट करत असताना, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्या. आता यामध्ये दोन चमचे खोबरे, एक
  • चमचा आले लसूण पेस्ट आणि थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • भाजलेले वाटण तयार करण्यासाठी दोन कांदे, चार चमचे खोबरे एक चमचा लसूण आणि आले हे सगळे थोड्या
  • तेलावर भाजून घ्यावे लागेल आणि मसाला छान बारीक वाटून घ्या.
  • आता आपल्याला मटण फ्राय करण्यासाठी 1 कांदा परतून त्यात कांदा लसूण मसाला काश्मिरी लाल तिखट गरम
  • मसाला धना जीरा पावडर टाका. भाजून केलेले वाटण दोन चमचे टाका
  • मग यात मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आणि मटण टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या
  • यानंतर मध्यम आचेवर मटण छान शिजवून घ्या, यासाठी तासभर लागू शकतो
  • मटण शिजले की मग गॅस बंद करा आणि गरमा गरम मटण भाकरीसह खाण्यासाठी सर्व्ह करा

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक