(फोटो सौजन्य: Pinterest)  
लाइफ स्टाइल

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी

मटण घोश हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. मसाल्यांदा सुगंधात नटलेली ही डिश नॉनलव्हर्सच्या तोंडाला नेहमीच पाणी आणते. चला जाणून घेऊया याची चमचमीत रेसिपी!

नुपूर भगत

भारताच्या खाद्यसंस्कृतीत "मटण घोश" हा एक अत्यंत लोकप्रिय आणि खास पदार्थ आहे. सुगंधी मसाले, मोहरीचं तेल आणि हळुवार शिजवलेलं मटण यामुळे याची चव विलक्षण लागते. हा पदार्थ साधारणपणे रविवारी घरात खास जेवणासाठी किंवा सण-उत्सवाच्या निमित्ताने बनवला जातो. बंगाली मटण घोशची खासियत म्हणजे त्यातील गरम मसाल्यांचा नाजूक सुगंध, बटाट्यांची साथ आणि मटणाचा रसाळ स्वाद.

नॉनव्हेज लव्हर्स असाल तर तुम्हाला आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. मसालेदार ग्रेव्हीत, मऊ मटण आणि सुगंधित चव या सर्वांचेच एकत्रित मिश्रण चवीला लाजवाब लागते. मटण प्रेमींना तर आजची रेसिपी म्हणजे पर्वणीच! रेसिपी थोडी वेळखाऊ असली तरी याची चव मात्र या सर्व गोष्टींना सार्थकी ठरते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • मटण – ५०० ग्रॅम (धुतलेले, मध्यम आकाराचे तुकडे)
  • बटाटे – २ (सोलून मोठे तुकडे)
  • कांदा – ३ मोठे (बारीक चिरलेले)
  • टोमॅटो – २ (बारीक चिरलेले)
  • आलं – १ इंच तुकडा
  • लसूण – ६ पाकळ्या
  • दही – ½ कप
  • मोहरीचं तेल – ४ टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • तिखट – २ टीस्पून
  • धणे पूड – १½ टीस्पून
  • जिरे पूड – १ टीस्पून
  • गरम मसाला – १ टीस्पून (बंगाली गोडा मसाला वापरल्यास उत्तम)
  • तमालपत्र – २
  • दालचिनी – १ तुकडा
  • लवंग – ३
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम आलं-लसूण वाटून पेस्ट तयार करा.
  • मोठ्या भांड्यात मटण, दही, हळद, मीठ, तिखट, आलं-लसूण पेस्ट घालून किमान १ तास मॅरिनेट करा.
  • कढईत मोहरीचं तेल गरम करून त्यात बटाट्यांचे तुकडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या, बाजूला काढून ठेवा.
  • त्याच तेलात तमालपत्र, दालचिनी, लवंग घालून फोडणी द्या.
  • कांदा सोनेरी होईपर्यंत परता, त्यानंतर टोमॅटो घालून मऊ होऊ द्या.
  • त्यात मॅरिनेट केलेलं मटण घालून १० मिनिटं मध्यम आचेवर परता.
  • धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला घालून चांगलं मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून हळुवार आचेवर मटण मऊ होईपर्यंत शिजवा (किंवा कुकरमध्ये
  • ४-५ शिट्या द्या).
  • शेवटी तळलेले बटाटे घालून ५ मिनिटं उकळा.
  • कोथिंबीर घालून गरमागरम भात किंवा लुचीसोबत सर्व्ह करा.
  • मोहरीचं तेल वापरल्याने पारंपरिक बंगाली चव येते, पण ते नसेल तर शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता.
  • बटाटे घालणं हे बंगाली मटण घोशचं वैशिष्ट्य आहे, ते नक्की टाका.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक