(फोटो सौजन्य: MadhurasRecipe Marathi
)
- फाफडा हा गुजरातमधील लोकप्रिय पारंपरिक स्नॅक आहे.
- बेसनापासून तयार होणारा हा पदार्थ कुरकुरीत आणि खमंग लागतो.
- फाफडा-जलेबी ही गुजरातमधील प्रसिद्ध पदार्थ मानला जातो.
फाफडा हा गुजरातमधील एक लोकप्रिय आणि पारंपारिक नाश्त्याचा प्रकार मानला जातो. जलेबी-फाफड्याचे काॅम्बीनेशन तर देशभर लोकप्रिय आहे. बेसनापासून तयार केला जाणारा खमंग आणि कुरकुरीत चवीचा फाफडा चवीला फार छान लागतो. संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय ठरतो. तुम्ही आजवर हा पदार्थ चाखला नेसल तर आजच याची रेसिपी घरी ट्राय करा.
स्नॅक्सचा हा पदार्थ एकदाच बनवून अनेक दिवस साठवून ठेवता येतो. फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत तयार होणारा हा पदार्थ क्वीन स्नॅक्ससाठी एक परफेक्ट पर्याय ठरतो. घरी आलेल्या पाहुण्यांना काही वेगळं आणि चवदार सर्व्ह करायचं असेल तर गुजराती फाफडा घरी नक्की बनवून पाहा. चला जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
- बेसन – १ कप
- ओवा – १ छोटा चमचा
- हळद – १/२ छोटा चमचा
- सोडा – चिमूटभर
- तेल – गरजेनुसार
- मीठ – चवीनुसार
- यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बेसन चाळून घ्या.
- यानंतर यात ओवा, अर्धा चमचा हळद, १ चमचा तेल आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालून साहित्य एकत्र मिसळून घ्या.
- आता यात कोमट पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
- लक्षात ठेवा पीठ जास्त घट्ट किंवा मऊ होणार नाही याची काळजी घ्या.
- मळलेल्या बेसनाच्या पीठीचे लहान लहान गोळे तयार करा आणि सुती कापडात काही वेळ झाकूण ठेवा.
- आता एक गोळा घेऊन त्याला लांबट आकाशात पातळ लाटा.
- जर पीठ जास्त लांब झाले असेल, तर त्याचे दोन तुकडे करून बाजूला ठेवून द्या.
- अशाच प्रकारे गोळ्याचे फाफडे तयार करा.
- दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवून द्या.
- जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा मध्यम आचेवर फाफड्यांना कुरकरीत होईपर्यंत छांन तळून घ्या.
- दोन्ही बाजूंनी फाफडे छान खमंग तळले की त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- तयार फाफडे एका प्लेटमध्ये हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
- तुम्ही चहासोबत यांची मजा लुटु शकता.
- जलेबी आणि फाफड्यांचे काॅम्बीनेशन फार लोकप्रिय आहे.