- मखाने आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे ठरतात.
- यापासून आपण चवदार शिरा देखील तयार करु शकता.
- हा शिरा तुम्ही देवीला अर्पण करु शकता.
११ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली असून १९ ऑक्टोबरपर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. याकाळात दरदिवशी देवीला नव्या रंगाची साडी, प्रसाद, फुले अर्पण केली जातात. तिसरा दिवस हा देवी चंद्रघटाला समर्पित असतो. देवील दरदिवशी काही ना काही गोड पदार्थ अर्पण केला जातो. अशात मखान्याचा शीरा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. मखाने आरोग्यासाठी भरपूर पाैष्टीक मानले जातात आणि ते उपवासातही खाल्ले जातात. तुम्ही देवीला अर्पण केल्यानंतर हा शीरा उपवासातही खाऊ शकता. मुख्य म्हणजे याला तयार करण्यासाठी फार वेळेची किंवा साहित्याची गरज भासत नाही. तुम्ही काही मिनिटांत झटपट हा पदार्थ तयार करु शकता. चला तर मग लगेच रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
- १ कप मखाना
- १० ते १२ काजू
- १० ते १२ बदाम
- २ मोठे चमचे रवा
- १ कप दूध
- ३ ते ४ मोठे चमचे साजूक तूप
- अर्धा कप साखर
- मखान्याचा शीरा तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईत तूप गरम करा.
- यात मखाने घालून काही मिनिटे मखान्यांना कढईत छान परतून घ्या.
- यानंतर तूपात काजू आणि बदाम घालून यांनाही काही मिनिटे खमंग परतून घ्या.
- मखाने, काजू आणि बदाम थंड झाले की यांना मिक्सरच्या भांड्यात टाका, यात थोडा रवा देखील घाला.
- सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटा आणि याची पावडर तयार करा.
- आता पुन्हा एक कढई गॅसवर ठेवा आणि त्यात तूप घाला.
- तूप गरम झाले की त्यात साखर घालून मंद आचेवर शिजवत ठेवा.
- साखर विरघळली की यात मिक्सरमध्ये वाटलेले साहित्य कढईत मंद आचेवर परतून घ्या.
- शेवटी यात वेलची पावडर घाला आणि शीरा खमंग शिजला की गॅस बंद करा.
- तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करु शकता.