There are many varieties of Maharashtrian sarees(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  There are many varieties of Maharashtrian sarees(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लाइफ स्टाइल

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांचे आहेत अनेक प्रकार; पैठणीपासून नऊवारीपर्यंत जाणून घ्या प्रत्येक साडीची खासियत!

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांना आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत विशेष स्थान आहे. पैठणी, नऊवारी, नारायण पेठ, खणाची साडी अशा विविध प्रकारच्या साड्यांची खासियत वेगळी आहे. प्रत्येक साडीचे वैशिष्ट्य, विणकाम, रंगसंगती आणि पारंपरिक महत्त्व जाणून घ्या.

siddhi

महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि स्त्रियांचे सौंदर्य यांचे प्रतीक म्हणजे महाराष्ट्रीयन साडी. प्रत्येक स्त्रीला साडी हा विषय अगदी जिव्हाळ्याचा असतो.त्यामध्ये प्रत्येक स्त्रीला नवनवीन प्रकारच्या साड्या आवडत असतात . मराठी स्त्रियांच्या पेहरावात साडीला विशेष महत्त्व आहे. लग्नसमारंभ, सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम किंवा एखादा खास सोहळा असो, प्रत्येक प्रसंगानुसार साडीची निवड केली जाते. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये साडीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यांची विणकामाची पद्धत, रंगसंगती, कापड आणि नक्षीकाम यांमुळे प्रत्येक साडीला स्वतंत्र ओळख मिळाली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रीयन साड्यांचे काही लोकप्रिय प्रकार कोणते आहेत.

१. पैठणी साडी

पैठणी ही महाराष्ट्राची शान आणि पारंपरिक वारसा मानली जाते.प्रत्येक स्त्रीला आपल्या जवळ एकतरी पैठणी साडी असावी असे वाटत असते. पैठण येथे या साडीची निर्मिती करण्याची परंपरा आहे.तेथील साड्यांना विशेष पसंती दिली जाते. रेशमी कापड, सोन्या-चांदीची जरी आणि मोर, कमळ, पोपट यांसारख्या आकर्षक नक्षी ह्या साडीवर पाहायला मिळतात.पैठणी साडीचे रंग हे अतिशय चमकदार असतात. लग्नसमारंभात पैठणीला विशेष पसंती दिली जाते.

२. नऊवारी साडी

प्रत्येक घरातील आजीचा हा एकेकाळी दैनंदिन पेहराव म्हणजे नऊवारी. पण सध्याच्या काळात फक्त लग्नात किंवा एखाद्या समारंभात ही साडी घालताना स्त्रिया दिसतात. नऊवारी साडीला लुगडे असेही म्हणतात. साधारण नऊ वार लांबीची असलेली ही साडी पारंपरिक पद्धतीने धोतरासारखी नेसली जाते. पूर्वीपासून महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या पेहरावात नऊवारीला महत्त्वाचे स्थान आहे.सर्व स्त्रिया ह्या आज देखील नऊवारी आवडीने वापरतात.

३. नारायण पेठ साडी

नारायण पेठ साडीचा उगम तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील नारायणपेट या गावाशी जोडलेला आहे, जिथे महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेल्या विणकर समुदायाने या साडीची विणकाम कला विकसित केली. नारायण पेठ साडी ही तिच्या आकर्षक रेशमी कापडासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण काठासाठी ओळखली जाते. नारायण पेठ साडीचा उगम तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील नारायणपेट या गावाशी जोडलेला आहे, जिथे महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेल्या विणकर समुदायाने या साडीची विणकाम कला विकसित केली. साडीच्या पदरावर आणि काठावर पारंपरिक नक्षीकाम केलेले असते. सणासुदीला या साडीला पसंती दिली जाते.

४. खणाची साडी

उत्तर कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि कोल्हापूर या भागांमध्ये खणाच्या कापडाची मोठी परंपरा मानली जाते. त्यावर चौकडी, बुट्ट्या आणि पारंपरिक नक्षीकाम पाहायला मिळते. खणाच्या साड्या पारंपरिक लूकसाठी उत्तम पर्याय आहेत. पारंपरिक काठ, ड्युएल (दोन रंगांची) रंगसंगती, नथ डिझाइन, चंद्रकोर, सरस्वती पदर आणि भौमितिक किंवा रेशमी नक्षीकाम हे खण साडीचे विशेष आकर्षण आहे.

५. शालू साडी

शालू साडी प्रामुख्याने लग्नसमारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेसली जाते.जी वजनाने जड तसेच लागण्याच्या मुहूर्तावर नेसण्यासाठी महाराष्ट्रीयन परंपरेत वापरली जाते. भरजरी काठ, आकर्षक पदर आणि रेशमी पोत यामुळे या साडीला शाही लूक मिळतो.ज्यावर सुंदर पद्धतीचे नक्षीकाम केलेले दिसून येते.

६. हिमरू साडी

छत्रपती संभाजीनगरची हिमरू वस्त्रकला प्रसिद्ध आहे. रेशीम आणि सुती धाग्यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या या वस्त्रांवर सुंदर नक्षीकाम केले जाते.हिमरू साडी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील प्रसिद्ध पारंपरिक वस्त्रकलेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हिमरू विणकामाची परंपरा ऐतिहासिक असून त्यावर पर्शियन आणि भारतीय कलाशैलीचा प्रभाव पाहायला मिळतो. या साड्या रेशीम आणि सुती धाग्यांच्या मिश्रणातून तयार केल्या जातात. त्यामुळे त्यांना एक वेगळाच पोत आणि आकर्षक चमक मिळते. या साडीवर फुले, पाने, वेलबुट्टी, भौमितिक आकार तसेच पारंपरिक नक्षीकाम विणलेले असते.

७. करवत काठी साडी

या साडीच्या काठावर करवतीच्या दातांसारखी दिसणारी नक्षी असते. पारंपरिक विणकाम आणि वेगळ्या काठामुळे या साडीला विशेष ओळख मिळते.करवत काठी साडी ही महाराष्ट्रातील पारंपरिक साड्यांपैकी एक आकर्षक साडी आहे. या साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या काठावर असणारी करवतीच्या दातांसारखी दिसणारी नक्षी. याच वैशिष्ट्यामुळे या साडीला करवत काठी असे नाव मिळाले आहे. या साडीमध्ये पारंपरिक विणकामासोबतच रंगसंगती आणि काठाच्या डिझाइनला विशेष महत्त्व दिले जाते. साडीच्या पदरावरही आकर्षक नक्षीकाम पाहायला मिळते. लाल, हिरवा, जांभळा, निळा आणि सोनेरी अशा रंगांमध्ये या साड्या सुंदर दिसतात. पारंपरिक लूक आवडणाऱ्या महिलांसाठी ही साडी उत्तम पर्याय ठरू शकते.

८. सुती साडी

सुती साडी ही महिलांच्या दैनंदिन वापरातील सर्वाधिक आरामदायी साड्यांपैकी एक मानली जाते. कापसाच्या धाग्यांपासून तयार होणाऱ्या या साड्या हलक्या, मऊ आणि त्वचेला आरामदायी असतात. विशेषतः महाराष्ट्रातील उष्ण आणि दमट हवामानात सुती साड्यांचा वापर अधिक सोयीस्कर ठरतो. या साड्यांमध्ये साध्या रंगांपासून ते आकर्षक प्रिंट्स, चौकडी, पट्टे आणि पारंपरिक नक्षीकामापर्यंत विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यांची खासियत म्हणजे त्या सहज नेसता येतात आणि दिवसभर वापरतानाही फारसा त्रास होत नाही. ऑफिस, घरातील कामे, बाजारपेठेत जाणे किंवा छोट्या कौटुंबिक कार्यक्रमांसाठी सुती साडी उत्तम पर्याय आहे.

महाराष्ट्रीयन साड्या केवळ फॅशनचा भाग नसून त्या आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अमूल्य ठेवा आहेत. बदलत्या फॅशनच्या काळातही या पारंपरिक साड्यांची लोकप्रियता कायम आहे.

Kalatmak Rajyog: डिसेंबरच्या सुरुवातीला कलात्मक योगाचा प्रभाव; कर्क राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत

Suspicious Death: हृदयविकाराचा झटका असल्याचा बनाव अन् कपाटात लपवलेली ती साडी! सुनेच्या मृत्यू प्रकरणात हत्येचा गंभीर संशय...

Rahul Gandhi on Rajiv Gandhi assassination: बाबांच्या हत्येसाठीच जाणीवपूर्वक सुरक्षा हटवली; राहुल गांधींचा धक्कादायक दावा

Huawei Mate X8 पाहिलात का? मोठी स्क्रीन आणि कॅमेरा पाहून सर्वच झाले चकित... लवकरच बदलू शकतो फोटोग्राफीचा अनुभव