Kitchen tips(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Kitchen tips: स्वयंपाकघरात अन्नाची नासाडी टाळायची आहे? वापरा या ८ सोप्या टिप्स!

Kitchen tips: स्वयंपाकघरात अन्नाची नासाडी टाळण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. आठवड्याचे नियोजन, गरजेपुरते अन्न शिजवणे, फळे-भाज्या योग्य पद्धतीने साठवणे आणि उरलेल्या अन्नाचा योग्य वापर केल्यास पैशांची बचत करता येते. जाणून घ्या अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ८ सोप्या किचन टिप्स.

siddhi berde
  • आठवड्याचे नियोजन करून आणि गरजेपुरतेच अन्न शिजवून स्वयंपाकघरातील अन्नाची नासाडी टाळता येते.

  • फळे, भाज्या आणि उरलेले पदार्थ योग्य पद्धतीने साठवल्यास त्यांचा ताजेपणा टिकवण्यास आणि अन्न सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

  • हवाबंद डब्यांचा वापर, योग्य प्रमाणात किराणा खरेदी आणि उरलेल्या अन्नाचा पुनर्वापर केल्यास पैशांची बचत करता येते.

बऱ्याचदा घरात जास्तीचे अन्न शिल्लक राहते.त्याने त्या अन्नाची नासाडी होत जाते किंवा ते अन्न दुसऱ्या दिवशी खावे लागते.त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाऊन घेणे महत्वाचे ठरते.आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकदा स्वयंपाकघरात अन्नाची नासाडी होताना दिसते. कधी गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवले जाते, तर कधी फळे, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने साठवले जात नसल्यामुळे खराब होतात. अन्नाची नासाडी केवळ पैशांचे नुकसान करत नाही, तर त्यामुळे अन्न आणि नैसर्गिक संसाधनांचाही अपव्यय होतो. मात्र, स्वयंपाकघरातील काही छोट्या सवयी बदलल्यास अन्नाची नासाडी सहज टाळता येऊ शकते.

१. आठवड्याचे नियोजन करा.

आठवडाभर कोणते पदार्थ बनवायचे, याचे आधीच नियोजन करा. त्यानुसार भाजीपाला, फळे आणि किराणा सामान खरेदी करा.त्या[परदार्थाना लागणारे इतर साहित्य जमवून ठेवा. यामुळे गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी होणार नाहीत आणि अन्न खराब होण्याची शक्यताही कमी होईल.

२. गरजेपुरतेच अन्न शिजवा.

अनेकदा कुटुंबातील सदस्यांच्या संख्येचा अंदाज न घेता जास्त अन्न शिजवले जाते.त्यासाठी आपल्या कुटुंबातील किती व्यक्ती घरी जेवतील तसे त्यांचा कडून अंदाज घ्या त्यांच्या त्यामुळे उरलेले अन्न फेकून द्यावे लागते. प्रत्येकाच्या भुकेनुसार अन्नाचे प्रमाण ठरवा. सुरुवातीला कमी प्रमाणात वाढा आणि गरज असल्यास पुन्हा वाढा.

३. फळे आणि भाज्या योग्य पद्धतीने साठवा.

प्रत्येक फळ आणि भाजी साठवण्याची पद्धत वेगळी असते. काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवणे योग्य असते, तर काही खोलीच्या तापमानात चांगल्या टिकतात. पालेभाज्या स्वच्छ करून कोरड्या कपड्यात किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांचा ताजेपणा टिकण्यास मदत होते.जास्त दिवस भाज्या फ्रीझ मध्ये भाज्या ठेवणे टाळा.

४. फ्रिजमध्ये जुने पदार्थ आधी वापरा.

खूप वेळा चुकून नवीन पदार्थ आणल्यावर आपण जुन्या वस्तू वापरायच्या विसरून जातो. फ्रिजमध्ये नवीन पदार्थ ठेवताना जुने पदार्थ पुढे आणि नवीन पदार्थ मागे ठेवा. यामुळे आधी खरेदी केलेल्या वस्तू सहज नजरेस पडतात आणि त्या वेळेत वापरता येतात. तसेच पदार्थांवर साठवण्याची तारीख लिहिण्याची सवय लावा.

५. उरलेल्या अन्नाचा पुनर्वापर करा.

रात्रीची उरलेली पोळी वापरून सकाळी पोळीचा चिवडा तयार करता येतात. उरलेल्या शिजवलेल्या भाज्यांपासून पराठे, सँडविच किंवा कटलेट बनवता येतात. मात्र, उरलेले अन्न योग्य तापमानात साठवलेले आणि खाण्यास सुरक्षित असणे आवश्यक आहे.अन्न खराब झाले असल्यास ते खाणे टाळा.

६. योग्य प्रमाणात किराणा खरेदी करा.

एकाच वेळी मोठ्या प्रमाणात किराणा खरेदी केल्यास काही पदार्थांची मुदत संपण्याची शक्यता असते.तसेच ते कीटक देखील कडधान्यांना लागणार नाहीत. त्यामुळे घरातील सदस्यांची संख्या आणि वापर लक्षात घेऊनच धान्य, डाळी, मसाले आणि इतर वस्तू खरेदी करा.

७. अन्न हवाबंद डब्यांमध्ये ठेवा.

डाळी, तांदूळ, कडधान्ये आणि इतर कोरडे पदार्थ हवाबंद डब्यांमध्ये साठवा. यामुळे ओलावा आणि किडींपासून त्यांचे संरक्षण करण्यास मदत होते. शिजवलेले अन्न झाकून योग्य वेळी फ्रिजमध्ये ठेवा.

Aundh ITI Crisis: इमारत कोसळण्यापूर्वी प्रशासनाला जाग येणार का? औंध आयटीआयच्या दुरवस्थेवर विद्यार्थ्यांचा संताप

घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश; आरोपी अटकेत, न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलिस कोठडी

रक्ताचा कर्करोग म्हणजे आयुष्याचा शेवट नाही! वेळीच निदान आणि आधुनिक उपचारांनी शक्य आहे नव्या आयुष्याची सुरुवात

राज्यातील निवडक एसटी बसस्थानकांवर दुमजली प्रसाधनगृहे उभारणार; परिवहनमंत्र्यांची माहिती

Black Friday Bank Collapse: ब्लॅक फ्रायडेच्या रात्री अमेरिकेची 6 अब्ज डॉलर्सची बँक बंद; FDIC ला 1.83 अब्ज डॉलर्सचा फटका शक्य