Which plants should you place in different areas of your home? From the living room to the bathroom (फोटो सौजन्य - सोशल मीडिया) Which plants should you place in different areas of your home? From the living room to the bathroom (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लाइफ स्टाइल

Home decor: घरातील कोणत्या ठिकाणी कोणती झाडे लावावीत? हॉलपासून ते बाथरूमपर्यंत जाणून घ्या योग्य रोपांची निवड!

Home decor: घराची सुंदरता वाढवण्यासाठी इनडोअर प्लांट्स हा उत्तम पर्याय आहे. मात्र, घरातील प्रत्येक जागेसाठी योग्य झाडांची निवड करणे महत्त्वाचे असते. हॉल, बेडरूम, किचन, बाल्कनी आणि बाथरूममध्ये कोणती झाडे लावावीत? तसेच कमी प्रकाशात वाढणारी आणि घराला आकर्षक लूक देणारी रोपे कोणती आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती!

siddhi
  • हॉलमध्ये मनी प्लांट, स्नेक प्लांट आणि रबर प्लांट लावल्यास घराच्या सौंदर्यात भर पडते.

  • बेडरूम आणि बाथरूमसाठी कमी प्रकाशात वाढू शकणारी स्नेक प्लांट, झेडझेड प्लांट आणि फर्न यांसारखी रोपे निवडता येतात.

  • किचनमध्ये तुळस, पुदिना आणि कोथिंबीर यांसारखी उपयुक्त रोपे लावा. रोपांची निवड करताना सूर्यप्रकाश, हवा आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्या.

घर सुंदर आणि आकर्षक दिसावे, यासाठी अनेकजण घरात विविध प्रकारची झाडे लावतात.त्यामध्ये कोणती झाडे कुठे लावावी हे काळात नाही त्यासाठी आपल्याला माहिती घेणं गरजेचं असतं . घरातील झाडांमुळे सजावटीला नैसर्गिक लुक मिळतो.त्यामुळे घरामध्ये एका प्रकाराची ताजगी राहते. तसेच घरात हिरवळ निर्माण झाल्यामुळे प्रसन्न वातावरण अनुभवता येते. मात्र, प्रत्येक झाडाला वाढण्यासाठी वेगवेगळ्या वातावरणाची आवश्यकता असते. काही झाडांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, तर काही झाडे कमी प्रकाशातही चांगली वाढतात किंवा कमी पाण्यात देखील चांगली राहतात. त्यामुळे घरातील कोणत्या ठिकाणी कोणती झाडे लावावीत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

१. हॉलमध्ये लावा आकर्षक झाडे लावा.

हॉल हा घरातील महत्त्वाचा भाग असल्यामुळे येथे मोठ्या आणि हिरव्यागार पानांची झाडे लावू शकता. अरेका पाम, रबर प्लांट आणि मनी प्लांट हे पर्याय उत्तम आहेत. अरेका पाममुळे हॉलला आकर्षक लुक मिळतो.तसेच मातेरी रंगाच्या फर्निचर बरोबर हिरवी झाडे अधिक सुंदर दिसतात. तर मनी प्लांट कमी देखभालीत वाढू शकते. ही झाडे खिडकीजवळ किंवा अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ठेवा.

२. बेडरूममध्ये 'ही' झाडे ठेवा.

बेडरूममध्ये झाडे ठेवताना कमी देखभालीची आणि खोलीतील प्रकाशानुसार वाढणारी झाडे निवडावीत. स्नेक प्लांट, पीस लिली आणि अ‍ॅलोव्हेरा हे चांगले पर्याय आहेत. स्नेक प्लांट कमी प्रकाशातही तग धरू शकते. पीस लिलीला पांढरी आकर्षक फुले येतात. मात्र, ही झाडे बेडरूममध्ये ठेवल्याने ऑक्सिजनचे प्रमाण लक्षणीय वाढते किंवा झोपेची गुणवत्ता सुधारते, असे समजू नये.

३. किचनमध्ये औषधी वनस्पती लावा.

किचनमध्ये स्वयंपाकासाठी उपयोगी पडणारी झाडे लावणे फायदेशीर ठरते. तुळस, पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता ही झाडे तुम्ही किचनच्या खिडकीजवळ किंवा बाल्कनीमध्ये लावू शकता. यामुळे स्वयंपाकासाठी ताजी पाने सहज उपलब्ध होतात. या झाडांना योग्य सूर्यप्रकाश आणि पाण्याची आवश्यकता असते.

४. बाल्कनीमध्ये रंगीबेरंगी फुलझाडे लावा.

घराची बाल्कनी सजवण्यासाठी जास्वंद, मोगरा, झेंडू आणि बोगनवेल यांसारख्या फुलझाडांची निवड करू शकता. या झाडांना साधारणपणे भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यामुळे बाल्कनीमध्ये किती वेळ सूर्यप्रकाश येतो, यानुसार झाडांची निवड करा. फुलझाडांमुळे बाल्कनी अधिक सुंदर आणि प्रसन्न दिसते.

५. खिडकीजवळ छोटी रोपे ठेवा.

घरातील खिडकीजवळ कमी जागा असेल, तर सक्युलंट्स, स्पायडर प्लांट आणि पोथोस यांसारखी छोटी झाडे लावू शकता. सक्युलंट्सना कमी पाण्याची गरज असते, तर स्पायडर प्लांट टांगत्या कुंडीतही छान दिसते. पोथोस अप्रत्यक्ष प्रकाशात चांगले वाढते.

६. बाथरूममध्ये आर्द्रता सहन करणारी झाडे लावा.

बाथरूममध्ये आर्द्रता जास्त असते. त्यामुळे योग्य प्रकाश मिळत असल्यास फर्न, झेडझेड प्लांट आणि लकी बांबू यांसारखी झाडे ठेवू शकता. मात्र, बाथरूममध्ये नैसर्गिक प्रकाश अजिबात येत नसेल, तर झाडांच्या वाढीसाठी पर्यायी प्रकाशाची व्यवस्था करावी.

७. झाडांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी?

घरात झाडे लावताना कुंडीला पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र असावे. झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. तसेच प्रत्येक रोपाच्या गरजेनुसार सूर्यप्रकाश आणि खत द्यावे. घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असल्यास विषारी ठरू शकणाऱ्या झाडांची माहिती घेऊनच त्यांची निवड करावी. योग्य झाडांची निवड आणि नियमित देखभाल केल्यास घराला सुंदर हिरवागार लुक देता येईल.

National Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व

Made In India उत्पादनांचा जागतिक डंका! Amazon ची भारतातून E-Commerce निर्यात 27 अब्ज डॉलर्सवर; 2030 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

MarMarathi Theatre News : ‘एक तिची गोष्ट’चा रौप्यमहोत्सवी टप्पा! २५ प्रयोग पूर्ण, पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप

फक्त 6 रुपयांत बेड गरम? Heated Blanket चा वीज वापर जाणून घ्या!

नाशिकमध्ये दुष्कळाची तीव्रता वाढली; २०१ गाव-वाड्यांना ६० टँकरने पाणीपुरवठा