राजकमल रेल्वे पुलाचे पाडकाम अंतिम टप्यात 
अमरावती

राजकमल रेल्वे पुलाचे पाडकाम अंतिम टप्यात! बांधकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वे स्टेशन चौक-बेलपुरा मार्ग बंद

Amravati News: राजकमल रेल्वे पुलाच्या पुनर्बाधणीसाठी अंदाजे १२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महारेल आणि एल अँड टी समूहामार्फत हा प्रकल्प राबविला जात आहे.(फोटो सौजन्य – AI)

सुरुची कदम

अमरावती शहराची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या राजकमल रेल्वे पुलाच्या पाडकामाने आता अंतिम टप्पा गाठला आहे. गुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन चौक ते बेलपुरादरम्यानचा रस्ता बॅरिके लावून पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यानंतर पोकलेन यंत्रांच्या साहाय्याने काही तासांतच पुलाचा वरचा भाग जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गापैकी एक असलेला हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

विशेष म्हणजे, हा मार्ग काही दिवसांसाठी नव्हे, तर नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बेलपुरा, राजापेठ आणि इर्विन चौक परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळ पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. यामुळे शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

तथापि, राजकमल चौक ते जयस्तंभ चौक या दरम्यानचा उड्डाणपुलाचा भाग सध्या वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र, बांधकामाच्या पुढील टप्प्यात हा भागही बंद केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. राजकमल रेल्वे पुलाच्या पुनर्बाधणीसाठी अंदाजे १२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महारेल आणि एल अँड टी समूहामार्फत हा प्रकल्प राबविला जात आहे.

ढिगाऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

पुलाच्या पाडकामानंतर निर्माण झालेल्या मोठ्या प्रमाणातील ढिगाऱ्याची विल्हेवाट लावणे हेही कंत्राटदारासमोर आव्हान ठरले आहे. नेहरू मैदान किंवा सायंसर मैदानावर ढिगारा साठविण्यास परवानगी नसल्याने पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागत आहे. पोकलेन आणि इतर वाहनांच्या साहाय्याने ढिगारा शहराबाहेरील भागात तसेच नवसारी परिसरात नेला जात आहे. पाडकामासोबतच ढिगाऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणांवर आहे.

केसांची वाढ खुंटली आहे? मग सकाळी उठल्यानंतर नियमित खा 'हे' पदार्थ, १५ दिवसांमध्ये दिसून येईल सकारात्मक बदल

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

विधानसभेचे संख्याबळ आता लवकरच वाढणार; 288 असलेली सदस्यसंख्या 432 वर जाणार?

Exclusive: सातारी स्वॅग, बेधडक स्वभाव; ‘येतेच आता मी नांदायला’मधील भूमिका मनाला भावली – हर्षद अतकरी

Weather Update : राज्यातील हवामानात पुन्हा बदल; थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आता नाही