Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट  
अमरावती

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Amravati News: ग्रामपंचायतींनी गावपातळीवर पाणीबचतीबाबत जनजागृती करावी, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता अतुल काटे यांनी केले आहे.

सुरुची कदम

आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे. अंजनगाव सुर्जी उपविभागांतर्गत येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील ६९ गावांना १ डिसेंबरपासून १० टक्के पाणीकपात करून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे हिवाळ्यातच नागरिकांना पाणीबचतीचे नियोजन करावे लागणार आहे.

शहानूर धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असून, सध्या उपलब्ध पाणीसाठ्यापैकी ७० टक्के साठा शिल्लक आहे. आगामी २०२७ ऑगस्ट पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलव्यवस्थापन उपविभागाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उपविभागीय अभियंत्यांनी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांना पत्र पाठवून आवश्यक सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतींनी गावपातळीवर पाणीबचतीबाबत जनजागृती करावी, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता अतुल काटे यांनी केले आहे.

उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट:

प्रत्येक नळजोडणीला तोट्या बसवाव्यात, पाण्याचा अपव्यय रोखावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींचे ? सहकार्य या नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय शहरातही १ डिसेंबरपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलणार आहे. सध्या दररोज होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसाआड केला जाणार आहे.

शहानूर धरणाची स्थिती उपलब्ध पाणीसाठा:

  • ७० टक्के नियोजनाचा कालावधी

  • ऑगस्ट २०२७ पाणीबचतीसाठी आतापासून उपाययोजना नळांना तोट्या बसवाव्यात.

  • पाण्याची गळती त्वरित थांबवावी.

  • अनावश्यक पाणीवापर टाळावा. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!

IPL 2027: लिलावात कोणता संघ लावणार Aaryavir Sehwag वर बोली? ३ संघ बनवू शकतात सेहवागच्या मुलाला करोडपती

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश; मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक

Jio Recharge Plan: 700 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... जिओचा 'हा' प्लॅन पाहून यूजर्स चकित, इतकी आहे व्हॅलिडिटी

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!