Bhandara News: गावोगावी विहिरी बनल्या कचराकुंड्या! साकोली-भंडाऱ्यात जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाची गरज...  
भंडारा

Bhandara News: गावोगावी विहिरी बनल्या कचराकुंड्या! साकोली-भंडाऱ्यात जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाची गरज...

पिढ्यान्पिढ्या गावाची तहान भागविणाऱ्या जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाकडे आता पाठ फिरवली जात आहे. अनेक विहिरींमध्ये कचरा टाकला जात आहे. काही विहिरींच्या परिसरात अस्वच्छता वाढली आहे.

हर्षदा जाधव
  • जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरविण्यात आली

  • एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

  • दुर्लक्षित असलेल्या विहिरी उद्याच्या उन्हाळ्यात गावासाठी आधार ठरू शकतात

साकोली/भंडारा: दुष्काळी स्थिती अल्प पर्जन्यमान यामुळे पाण्याचा थेंब थेंब जपण्याची वेळ येऊन ठेपली असताना गावोगावी उपलब्ध असलेली जलसंपत्ती मात्र दुर्लक्षाच्या गर्तेत सापडली आहे. नळ योजना आणि बोअरवेलच्या सुविधांवर भर देताना पिढ्यान्पिढ्या गावाची तहान भागविणाऱ्या जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरविण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या विहिरींची अवस्था कचराकुंडीसारखी झाली असून, काहींचे अस्तित्वच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्चुन जलसंधारणाच्या नव्या योजना राबवित आहे, तर दुसरीकडे गावात आधीपासून असलेले जलस्रोत मात्र उपेक्षित आहेत. एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त होत असताना, नव्या जलस्रोतांच्या निर्मितीइतकेच जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे ठरणार आहे.

उपलब्ध जलसंपत्तीच्या जतनालाही प्राधान्य हवे

पावसाचे अनिश्चित स्वरूप, हवामानातील बदल आणि संभाव्य अल-निनोचा प्रभाव यामुळे आगामी काळात पाणी उपलब्धतेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. अशा परिस्थितीत जलसंधारणाच्या नव्या योजना राबविण्याबरोबरच गावातील जुन्या विहिरी, तलाव आणि अन्य पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. अस्तित्वात असलेल्या जलसंपत्तीचा वापर आणि संवर्धन करण्याऐवजी ती दुर्लक्षित ठेवून नव्या योजनांवरच अवलंबून राहणे दीर्घकालीन जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. (फोटो सौजन्य – AI Created)

जुन्या जलस्रोतांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याची गरज

जुन्या विहिरीचा गाळ काढणे, स्वच्छता करणे, ढासळलेल्या बांधकामांची दुरुस्ती करणे, परिसरातील अतिक्रमण हटविणे आणि पावसाचे पाणी विहिरीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. योग्य तांत्रिक तपासणी आणि नियोजनातून या विहिरींचे भूजल पुनर्भरणासाठीही उपयोग होऊ शकतो. ग्रामपंचायतींनी गावातील जुन्या विहिरीची नोंद घेऊन त्यांची सद्यस्थिती तपासावी. ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता व पुनरुज्जीवनाची मोहीम राबविल्यास अनेक जलस्रोत पुन्हा उपयोगात आणता येतील, पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरची मागणी करणे किवा पर्यायी व्यवस्था उभारणे यापेक्षा संकट येण्यापूर्वीच उपलब्ध पाणी जपणे अधिक महत्त्वाचे आहे. आज दुर्लक्षित असलेल्या विहिरी उद्याच्या उन्हाळ्यात गावासाठी आधार ठरू शकतात, त्यासाठी प्रशासनाने नव्या जलयोजनांचा आढावा न घेता जुन्या जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठीही स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.

नळयोजनांनी विहिरींचे महत्त्वच केले कमी

एकेकाळी गावातील विहीर म्हणजे पाण्याचा मुख्य आधार होता. पहाटे पाणी भरण्यासाठी महिलाची होणारी लगबग, विहिरीच्या काठावर रंगणाऱ्या सुख-दुःखाच्या गप्पा, शाळा सुटल्यानंतर मुलांचा गोंधळ आणि शेतातून परतलेल्या गुराढोरांची भागणारी तहान, अशा असंख्य आठवणी या विहिरीशी जोडलेल्या आहेत. पाण्याच्या निमित्ताने गावातील माणसे एकत्र येत आणि विहीर गावाच्या सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू ठरत असे. मात्र, काळ बदलला, घराघरांत नळ आले, बोअरवेलची सुविधा वाढली आणि विहिरीवर जाऊन पाणी भरण्याची गरज कमी झाली. सुविधांचा विस्तार झाला; पण त्याचवेळी जुन्या जलस्रोतांची देखभाल करण्याची जबाबदारीही दुर्लक्षित झाली. अनेक विहिरींमध्ये कचरा टाकला जात आहे. काही विहिरींच्या परिसरात अस्वच्छता वाढली असून, पाण्याचा वापर बंद झाल्याने त्यांची नियमित स्वच्छताही होत नाही. ज्या विहिरीनी अनेक पिढ्यांची तहान भागविली, त्याच आज कचराकुंड्यांच्या स्वरूपात दिसत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Skin Care Tips: सुरकुत्या- पिंपल्स कायमचे होतील गायब! आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा जायफळाचा आयुर्वेदिक लेप

बनावट कागदपत्रे, नियमबाह्य वाहतूक अन् अवैध मालवाहतूक; खासगी ट्रॅव्हल्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Nepal Teacher Viral Video: 'दिलरुबा दिलनशीं' गाण्यावर नेपाळी टीचरचा मुलांसोबत भन्नाट ठेका; VIDEO पाहून नेटकरी फिदा

CJP Leader Targets PM Modi: सौरव दास यांची विमानतळावर अडवणूक; आशुतोष-अभिजीत यांचा थेट केंद्रावर निशाणा

तुमच्या गाडीतही आहे बनावट इंजिन ऑइल? वेळीच ओळखा! अस्सल ल्युब्रिकंट्स का महत्त्वाचे आहेत? काही रुपयांची बचत पडू शकते महागात!