महाराष्ट्र

तुंगार्ली धरण परिसरात स्वच्छता मोहीम ; लोणावळा नगरपरिषदेकडून मोहिमेचा प्रारंभ

Aparna
लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून शहराच्या विविध भागात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून बुधवारी तुंगार्ली धरण परिसरात नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

तुंगार्ली धरण हे लोणवळा शहारत येणाऱ्या पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण स्थळ आहे. येथील संथ निळे पाणी, धरणाच्या पाण्याला लागूनच असलेले हिरवेगार डोंगर, शांत आणि रमणीय परिसर पर्यटकांसोबतच स्थानिक नागरिकांना देखील आकर्षित करून घेत असतो. मात्र पर्यटकांच्या सोबत याठिकाणी कचरा देखील वाढत जातो. तुंगार्ली गावातील स्थानिक ओमकार तरुण मंडळ वर्षातून किमान दोन वेळा नगरपरिषदेच्या सहकार्याने याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून हा कचरा साफ करत असते. त्यामुळे नगरपरिषदेने आवाहन करताच ओमकार तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

-प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्यांचे संकलन

नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, राजू बच्चे, प्रमोद गायकवाड, सुधीर शिर्के, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, विशाल पाडाळे, विशाल विकारी, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, शिवाजी मेमाणे, शरद कुलकर्णी, यशवंत मुंडे, वैशाली मठपती, दत्ता सुतार यांच्यासह नगरपरिषद अधिकारी तसेच सर्वच खात्याचे कर्मचारी या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते. धरणाची मुख्य भिंत परिसर तसेच धरणाच्या बँक वॉटर परिसरातील प्लास्टिक कचरा, रिकाम्या तसेच फुटलेल्या काचेच्या बाटल्या आदी मोठ्या प्रमाणात जमा करून ते सर्व कचराडेपोवर पाठवण्यात आले.

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी