महाराष्ट्र

कल्याणमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद! आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती

कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला महिलांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदुरणी जाखड यांनी सांगितले की, ठाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शुभांगी मेरे

कल्याण : "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजने अंतर्गत महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या आणि २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना "नारी शक्ती दूत" या ॲपद्वारे अर्ज भरावयाचा आहे. हे अर्ज भरण्यासाठी ३६६ मतदान केंद्र उभारली जाणार असून, त्यापैकी १९० मदत केंद्रे स्थापन झाली आहेत. २८ आरोग्य केंद्रातही मतदकक्ष उभारण्यात आले असून, २७७ अंगणवाड्यामधूनही लाभार्थी महिलांना अर्ज भरण्यास सहाय्य केले जात आहे. या योजनेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रभागस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर ३ शासकिय सदस्य आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शासकीय सदस्य राहणार आहेत. या प्रभागस्तरीय समितीमार्फत अर्जांची छाननी करुन पात्र महिलांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी १९ जुलै रोजी झालेल्या झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सदर योजनेची मुदत दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून महापालिका क्षेत्रातील पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा आवर्जुन लाभ घ्यावा, असेही आवाहन‍ महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी केले.

आगामी निवडणूकांपूर्वी इलेक्ट्रोरोल इंन्डेक्स तयार करण्यासाठी माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयास भेट देऊन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा केली. Free आणि Fare निवडणूका होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांचे समवेत आढावा बैठकीचे आयोजन माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

Freedom, Fairness, transparency या सूत्रांवर निवडणूक होण्यासाठी नागरीकांचे, नगरसेवकांचे Perception घेतले जाईल, अशी माहिती माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांनी दिल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.

रेल्वे स्थानक परिसरात होणा-या वाहतुक कोंडीबाबत वाहतुक पोलीस, आरटीओचे अधिकारी यांनी वाहतुकीचे नियोजन करावे, जेणेकरुन वाहतुक कोंडीवर नियंत्रण येईल. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवरही महापालिका व पोलीस यांचेमार्फत संयुक्तरित्या कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून वाहतुक विभागाला जड वाहनांसाठी या सप्ताहामध्ये नोटीफिकेशन काढून अंमलबजावणी करणेबाबत सांगितले असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली.

Paras Mhambrey: IPL 2027 आधी पंजाब किंग्सचा मोठा डाव! हार्दिकनंतर मुंबई इंडियन्सचा आणखी एक PBKS च्या ताफ्यात

Home decor: घरातील कोणत्या ठिकाणी कोणती झाडे लावावीत? हॉलपासून ते बाथरूमपर्यंत जाणून घ्या योग्य रोपांची निवड!

National Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व

Made In India उत्पादनांचा जागतिक डंका! Amazon ची भारतातून E-Commerce निर्यात 27 अब्ज डॉलर्सवर; 2030 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

MarMarathi Theatre News : ‘एक तिची गोष्ट’चा रौप्यमहोत्सवी टप्पा! २५ प्रयोग पूर्ण, पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप