Marathi Breaking News Live Updates: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यात फोटो आणि व्हिडिओ पुरावा म्हणून दिले आहेत. त्यानंतर ते फोटो माध्यमांमध्ये आले. हेच फोटो पाहून बीड तालुक्यातील जाणेगाव येथील तरुण अत्यंत निराश झाला. याच नैराश्येत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून दिवसभरातील अपडेट्स तुम्ही पाहू शकता.
कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरून कर्जत परिसरात विकणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे. राजेश जाधव विरोधात डोंबिवली मानपाडा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ग्राहकांचा विरोध पाहून वीज प्रीपेड मीटर बसविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे राज्यात प्रीपेड मीटर दिसणार नाहीत. तसेच आता ग्राहकांना यापुढे प्रीपेड मीटर देण्यात येणार नाहीत. तर पूर्वीप्रमाणे पोस्टपेड इलेक्ट्रानिक मीटर लावण्यात येत आहेत. जे इलेक्ट्रॉनिक मीटर लावतील त्यांच्या वीज वापराच्या शुल्कामध्ये दहा टक्के सूट देणार असून त्यासंदर्भातील निर्णयही घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यात सध्या 12 विच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच कामोठे वसाहतीत 12 विच्या उत्तरपत्रिकेंचा अख्खा संचच रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडासी आहे. 28 मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल बागल यांना हा संच सापडल्या नंतर या बाबतची माहिती त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमधील अनेक नेत्यांवर विरोधकांनी जोरदार टीका आणि गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या देखील राजीनामा दिला आहे. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला. यामुळे आता जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेत नेत्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात ‘मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे,’ असे काही नाही, असे विधान केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उठलेल्या आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांनी बोलू दिले, त्यामुळे वाढलेल्या गोंधळामुळे सभागृह तहकूब करावे लागले
जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला. यामुळे आता जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेत नेत्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.
पनवेल - राज्यात सध्या 12 विच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच कामोठे वसाहतीत12 विच्या उत्तरपत्रिकेंचा अख्खा संचच रस्त्यावर सापडला असून, 28 मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल बागल यांना हा संच सापडल्या नंतर या बाबतची माहिती त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली असून,सापडलेल्या उत्तरपत्रिका पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत.
राज्यपाल नियुक्त रिक्त असलेल्या पाच जागांपैकी २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असून त्यांनी माजी आमदार झिशान सिद्दीकी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांना संधी देण्याचे ठरवले आहे. सध्या राजकीय वर्तुळात या दोन नावाची चर्चा सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांचा वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई यांनी पराभव केला होता. तर राष्ट्रवादी फुटीनंतर माजी खासदार आनंद परांजपे यांनी अजित पवार यांची साथ दिली होती. त्यामुळे त्यांचे आता पुनर्वसन करण्यात येणार आहे. यापूर्वी ७ जणांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी देण्यात आली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यात त्यांनी आजारपणाचे कारण दिले आहे. या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे असणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु होती. त्यानुसार, काही नावेही समोर आली होती. असे असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कार्यभार स्वत:कडे ठेवला आहे.
राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजता विधानभवनात ही बैठक होईल. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाल्यानंतक मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे बघणं महत्त्वाचं असेल.
अर्थसंकल्प अधिवेशनात आमदार निलेश राणेंनी सरकारला जाब विचारलाय. मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाला १८.५० हजार कोटींची तरतूद केलीय. पण यापैकी किती खर्च महामार्गावर झालाय? लोक आता अंगावर यायला लागलीत. आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत, असा सवाल देखील राणेंनी विचारला आहे.
विधानपरिषदेत अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून एकच गदारोळ उडाला. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अबू आझमी यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना तुरुंगात का टाकण्यात आले नाही असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं. यावेळी उत्तर देताना, अबू आझमी यांना 100 टक्के तुरुंगात टाकले जाईल. अबू आझमी असो वा दुसरे कोणीही असो. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. आवश्यकता असल्यास आम्ही वरच्या कोर्टात दाद मागू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना राजकारण्यांकडून मिळणारे अभय यामुळे राज्यात वादंग निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहे. अंजली दमानिया यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने बुधवारी रिक्षासह दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले आहेत. पालघर मनोर रस्त्यावर शेलवली गावाच्या हद्दीत रेमी कंपनीसमोर हा अपघात घडला आहे.
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारच्या घटना वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर आत्याचार झाल्याची घटना ताजी असताना मुंबईत देखील अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
पुण्याच्या मध्यभागातून एका सराईताला पकडून पुणे पोलिसांनी नंतरच्या तपासातून एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड केलेले असताना आता नाना पेठेतून मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. छापेमारीत त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजारांचे एमडीसह इतर असा १३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाने मंगळवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये करवाढ न करता पुणेकरांना एकीकडे दिलासा दिला. त्याचवेळी यंदाच्या आर्थिक वर्षापासुन मीटरप्रमाणे पाणी वापराचे बिल भरण्याची व्यवस्था मात्र केली. त्यामुळे नागरीकांना आता वीज बिलाप्रमाणेच पाणीपट्टी बिलासासाठीही खिशाला कात्री लागणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी महापालिकेचे २०२५-२६ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यात फोटो आणि व्हिडिओ पुरावा म्हणून दिले आहेत. त्यानंतर ते फोटो माध्यमांमध्ये आले. हेच फोटो पाहून बीड तालुक्यातील जाणेगाव येथील तरुण अत्यंत निराश झाला. याच नैराश्येत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
लँड डेव्हलपर्सच्या आत्महत्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी महिला प्रॉपर्टी डिलर्ससह 16 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपींमध्ये सिटीलाईट रिअलिटी ग्रुपच्या अख्तर बानो, आसरा रिअल इस्टेटच्या विजेता तिवारी, सादि
कोठडीत असलेला आरोपी दत्तात्रय गडेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये अनेक बाबी समोर येत आहेत. चौकशीतून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून बस स्थानकाच्या परिसरात वावरत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे आज (दि.6) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधींचा 6 ते 8 मार्च या कालावधीत मुंबई आणि अहमदाबादचा दौरा असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबईच्या दौऱ्यात राहुल गांधी हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाची माहिती घेणार आहेत. याशिवाय, तेथील कामगारांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.