महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील 38 विधानसभा जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिाया पार पडली. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात 42 जागांवर मतदान झाले. राज्यात 81 जागा आहेत. दोन्ही राज्यांचे निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत.
मतदानानंतर महाराष्ट्रात 6 एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यापैकी पाच एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडी सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तर एका एक्झिटपोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्याचा अंदाज सांगण्यातआला आहे. तर झारखंडसाठी आतापर्यंत 3 एक्झिट पोल आले आहेत. तिन्ही ठिकाणी भाजप आघाडीला बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यात न्युज 18 मॅट्रिजमध्ये 150-160 जागा भाजपप्रणित महायुतीला आणि 110 ते 130 जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 8-10 जागा अपक्षांना मिळू शकतात. त्याच बरोबर P-MARQ च्या आकडेवारीनुसार 137-157 जागांवर महायुती आघाडीवर असेल तर 126-146 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर असेल, तर 2-8 जागांवर अपक्ष उमेदवारांना मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय पीपुल्स पल्स या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात 175-195 जागा महायुतीला, 85-12 जागांमहाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर 7-12 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. न्युज -24 चाणक्य या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलच्या सर्वेक्षणात 152-160 जागा महायुतीला, 130-138 जागा महाविकास आघाडीला आणि 6-8 जागा अपक्षांना मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यानंतर इलेक्टोरल एज या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 122-186 जागांवर महायुती आघाडीवर आहे. 69-121 जागांव महाविकास आघाडी आणि 12-29 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय पोल ऑफ पोल्स या संस्थेने केलेल्या एक्झिट 153 जागा महायुतीला 122 जागां महाविकास आघाडीला मिळू शकतात. तर 12 जागावर अपक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.