महाराष्ट्र

चला हवा येऊ द्यामध्ये शहाजी बापू पाटलांनी 'हा घेतला उखाणा', सोशल मीडियावर जोरदार चर्चा

‘काय झाडी…काय डोंगार… काय हाटेल...ओकमध्ये हाय’ या डायलॉगची मोठी चर्चा झाली. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (Shahji Bapu Patil) हे गुहावटीत (Guhavati) असताना त्यांना एका कार्यकर्त्यांचा फोन आला त्यानंतर त्यांनी आपल्या माणदेशी (Mandeshi) बोलीतील संवादामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वरील डायलॉगची क्रेझ व भुरळ सर्वांनाच पाडली.

Amrut Sutar

मुंबई : राज्यात सत्तांतर झाले असले तरी, दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री कोण होणार, किंवा कोणाचे सरकार येणार, यापेक्षा मागील पंधरा वीस दिवस सोशल मीडियावर (Social Media) ‘काय झाडी…काय डोंगार… काय हाटेल...ओकमध्ये हाय’ या डायलॉगची मोठी चर्चा झाली. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (Shahji Bapu Patil) हे गुहावटीत (Guhavati) असताना त्यांना एका कार्यकर्त्यांचा फोन आला त्यानंतर त्यांनी आपल्या माणदेशी (Mandeshi) बोलीतील संवादामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वरील डायलॉगची क्रेझ व भुरळ सर्वांनाच पाडली. राज्यात सरकार आल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांचं त्यांच्या सांगोला (Sangola) या मूळगावी जल्लोषात स्वागत झालं. त्यानंतर त्यांना तुफान प्रसिद्धी मिळत असून, अनेक माध्यमांनी त्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे. आपला राजकीय प्रवास व गुवाहाटीचे किस्से शहाजीबापू पाटील सर्वांना सांगत आहेत, नुकतेच शहाजी बापूंची चला हवा येऊ द्यामध्ये एंट्री झाली. यावेळी त्यांनी धमाल उडवून दिली. तसेच त्यांनी पत्नीसाठी खास दुष्काळी उखाणा सुद्धा घेतला. या उखाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, पाटील चला हवा येऊ द्यामध्ये आल्यानंतर, या कार्यक्रमात भाऊ कदमने त्यांचा काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील... एकदम ओक्के असा डायलॉग मारला. तर पाटील यांनी या कार्यक्रमांचे कौतूक करताना, काय तो चला हवा येऊ द्या कार्यक्रम..काय तो भाऊ...काय ते डॉक्टर साहेब सगळं ओकेमध्ये आहे. असं वर्णन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अँकर निलेश साबळेंनी पाटील यांना उखाणा घेण्यास सांगितल्यांवर “माझ्या दुष्काळी तालुक्याला पाणी पुरवणाऱ्या नदीचं नाव आहे माण…, आणि रेखा माझी जान...” असा दुष्काळी भागाची व्यथा मांडणार उखाणा शहाजीबापूंनी घेतला. या उखाण्याला सर्वांनी टाळया वाजवून दादही दिली. तसेच हा उखाण्याची जोरदार चर्चा होत असून, चला हवा येऊ दयामध्ये सोमवारी (१८ जुलै रोजी) भाग दाखवला जाणार आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!