महाराष्ट्र

Navi Mumbai: पालिकेच्या तिजोरीत आता पर्यत विक्रमी वार्षिक कर भरणा; आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली

पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सुरू असलेल्या अभय योजनेला पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली झाली आहेे.

तृप्ती गायकवाड

पनवेल : पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सुरू असलेल्या अभय योजनेला पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला असून आतापर्यंत 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा विक्रमी मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. अभय योजनेचा लाभ घेत नागरिकांनी एकूण 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची शास्तीमाफी मिळवली आहे.

आयुक्त  मंगेश चितळे यांच्या सूचनेप्रमाणे महापालिकेने मालमत्ता करधारकांसाठी अभय योजना सुरू केली असून महानगरपालिकेने नुकतीच या योजनेस मुदतवाढ दिली आहे. या योजना अंतर्गत 15 सप्टेंबर पर्यन्त मालमत्ता करावरील शास्तीवर 90 टक्के सूट मिळणार असून 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीत 75 टक्के सूट मिळणार आहे.

दरम्यान अभय योजनेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याने आजवरची सर्वात विक्रमी वसुली पालिकेने केली आहे. आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी 500कोटी 3 लाखाचा भरणा पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.याच बरोबर सुमारे 100कोटीहून अधिक रकमेची शास्तीमाफी मिळवली आहे.

कर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीस प्रोत्साहन

महापालिकेच्यावतीने करदात्यांना डिजिटल पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात असून ई-बिल स्वीकारणे, डिजिटल पद्धतीने कर भरणे यासाठी वेबसाईट बरोबरच PMC TAX APP, पनवेल कनेक्ट ॲपद्वारे सुलभरीत्या कर भरणे शक्य झाले आहे. याशिवाय 'करमित्र चॅटबॉट' देखील सुरू केले आहे. हा अत्याधुनिक चॅटबॉट मालमत्ता करदात्यांना घरबसल्या त्वरित माहिती, मार्गदर्शन आणि ऑनलाइन मदत पुरवेल.

ऑनलाईन भरल्यास 2 टक्के सवलत

पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईट, PMC TAX APP अथवा पनवेल कनेक्ट ॲपद्वारे नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन भरल्यास त्यांना 2 टक्के सवलत मिळेल. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित कर लवकरात लवकर भरावा असे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.

Mumbai Terror Attack : मुंबई रक्ताने न्हाली, पण पाकिस्तानात जल्लोष? 26/11ची ती काळरात्र; 'असे' होते कसाबच्या मुंबई प्रवेशामागचे धक्कादायक सत्य

Pune Airport वर गाडीने जाताय? मग आधी 'ही' बातमी वाचाच; नियम मोडल्यास थेट...

पुणे महापालिकेचा थेट महापौरांनाच टोला! मंजुषा नागपुरेंच्या फ्लेक्सचा फोटो शेअर करत म्हणाले...

Pune Police Combing Opration: ७२ ठिकाणी छापेमारी, ३७५ हॉटेल्स; गोळीबारानंतर पुणे पोलिसांचे रात्रभर कॉम्बिंग ऑपरेशन

India Bans Pakistani Web Series: पाकिस्तानी कंटेंटला भारतात नो एन्ट्री? केंद्र सरकारचा Netflix ला कडक इशारा!