शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बची धमकी? न्यायालय परिसर रिकामा Pune Shivajinagar Court Bomb Threat, Shivajinagar Court Evacuated Pune Today
महाराष्ट्र

Pune Court Bomb Threat: शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बची धमकी? न्यायालय परिसर रिकामा

Pune Court Bomb Threat: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर परिसर रिकामा करण्यात आला. पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क; तपास सुरू

anuradha sagar
  • शिवाजीनगर न्यायालयात आज (२३ नोव्हेंबर) बॉम्ब ठेवल्याची चर्चा

  • पोलिसांच्या सूचनेनुसार वकील, कर्मचारी व नागरिकांना बाहेर काढत परिसर रिकामा

  • गेल्या आठवड्यातही बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालय परिसर रिकामा

Pune Court Bomb Threat: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची चर्चा सुरू झाल्याने आज (२३ नोव्हेंबर) एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बॉम्बची ठेवल्याची चर्चा सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून, परिसराची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, न्यायालयात बॉम्ब असल्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

शिवाजीनगर कोर्टात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज सुरू असताना न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. ही माहिती काही वेळातच संपूर्ण परिसरात पसरली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसर खाली करण्याच्या सूचना दिल्या.

या सूचनेनंतर न्यायालयातील वकील, कर्मचारी आणि इतर नागरिक परिसरातून बाहेर पडले. गेल्या आठवड्यातही बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाल्याने सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढली आहे.

पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी न्यायालय परिसराची तपासणी केली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत न्यायालयात बॉम्ब आढळल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यापूर्वी राज्यातील न्यायालयांना धमकीचा ई-मेल

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विविध न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. या धमकीनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. संबंधित न्यायालयांमध्ये तपासणी करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान धमकीमध्ये तथ्य आढळले नसल्याची माहिती समोर आली होती.

या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. आता पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब असल्याची चर्चा सुरू झाल्याने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसर आज का रिकामा करण्यात आला?

आज (२३ नोव्हेंबर) दैनंदिन कामकाज सुरू असताना शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी न्यायालय परिसर तातडीने रिकामा केला.

न्यायालयात बॉम्ब आढळल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे का?

नाही, पुणे पोलीस आणि तपास यंत्रणांकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू असली तरी न्यायालयात बॉम्ब आढळल्याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

यापूर्वीही शिवाजीनगर न्यायालयाला अशी धमकी मिळाली होती का?

होय, गेल्या आठवड्यातही शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता आणि त्यावेळीही खबरदारी म्हणून न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला होता.

'झालं बाबा एकदाचं लग्न...' संतोष जुवेकरने दिली आनंदाची बातमी; VIDEO पाहून चाहतेही खुश

Pune Metro आता थांबणार नाय! 'या' मार्गावर दररोज ५० हजार प्रवाशांचा प्रवास

Sourav Ganguly : कुलदीप अथवा मानव कुठे आहेत? वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्यानंतर गांगुलींनी उपस्थित केला प्रश्न

Navi Mumbai News: बेलापूर न्यायालयात खळबळ! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

बॅटने नुसती हाणामारी! Kieron Pollard ने टी 20 फॉर्मटमध्ये केला 'हा' रेकॉर्ड, बटलरचे स्थान धोक्यात