बेकायदेशीरपणे भारतात राहणे बांगलादेशी तरूणाला चांगलेच महागात पडले; कोर्टाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा 
पुणे

बेकायदेशीरपणे भारतात राहणे बांगलादेशी तरूणाला चांगलेच महागात पडले; कोर्टाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

पासपोर्ट, व्हिसा किंवा कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्डसह इतर भारतीय ओळखपत्रे तयार करून घेतली.

Krupadan Awale
  • भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशी तरुणाला न्यायालयाने शिक्षा सुनावली.

  • आरोपीचे नाव सोहाग सुकुमार मजुमदार (वय २०) असे आहे.

  • आरोपी मूळचा बागेरहाट, बांगलादेश येथील रहिवासी आहे.

पुणे : भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्रे मिळवणाऱ्या बांगलादेशी तरुणाला पिंपरी-चिंचवड सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिक्षा भोगल्यानंतर त्याला बांगलादेशात परत पाठवण्याचे, तसेच त्याची बनावट ओळखपत्रे रद्द करण्याचे निर्देशही अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी यांनी दिले.

सोहाग सुकुमार मजुमदार (वय २०, रा. चिंचवड एमआयडीसी; मूळ रा. बागेरहाट, बांगलादेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पासपोर्ट, व्हिसा किंवा कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्डसह इतर भारतीय ओळखपत्रे तयार करून घेतली. भारतीय नागरिक असल्याचे भासवून तो चिंचवड एमआयडीसी परिसरात राहत होता. पिंपरी पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला २३ जानेवारी २०२५ रोजी अटक केली होती. खटल्यात दोषारोप निश्चितीच्या वेळी आरोपीने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि परदेशी नागरिक कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने त्याला दोषी ठरवले.

आरोपी परदेशी नागरिक असून, त्याने बेकायदेशीरपणे प्रवेश करून बनावट भारतीय ओळखपत्रे मिळवली असल्याने त्याला योग्य शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी केला. तर, आरोपीचा हा पहिलाच गुन्हा असून, तो गरीब आहे आणि त्याने पश्चात्ताप व्यक्त करत गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी बाजू बचाव पक्षाचे वकील ए. एस. साळवे यांनी मांडली.

या गुन्ह्यात किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायद्याने बंधनकारक असल्याने ती कमी करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, आरोपी जानेवारी २०२५ पासून न्यायालयीन कोठडीत असल्याने तो कालावधी शिक्षेतून वजा करून उर्वरित कालावधीसाठीच त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे.

शिक्षा भोगल्यानंतर कारागृह अधीक्षकांनी परदेशी नागरिक प्रादेशिक नोंदणी कार्यालयाला आणि संबंधित यंत्रणांना कळवून त्याला रीतसर बांगलादेशात परत पाठवावे, तसेच त्याची बनावट ओळखपत्रे रद्द करावीत, असे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, या प्रकरणातील सहआरोपी सुमन गोपाल टिकेदार याने गुन्हा कबूल न केल्याने त्याच्याविरुद्धचा खटला सुरूच राहणार आहे.

FAQ

1. बेकायदा वास्तव्याप्रकरणी शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

सोहाग सुकुमार मजुमदार (वय २०) असे आरोपीचे नाव आहे.

2. आरोपी कोणत्या देशाचा नागरिक आहे?

आरोपी मूळचा बांगलादेशातील बागेरहाट येथील रहिवासी आहे.

3. न्यायालयाने आरोपीला किती शिक्षा सुनावली?

न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

लग्नाच्या १३ वर्षांनंतर अर्जुन बिजलानी पुन्हा चढणार बोहल्यावर! पत्नी नेहासोबत अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका व्हायरल

5 Wicket Haul: आकाशदीपने दुसऱ्यांदा घेतल्या करिअरमध्ये 5 विकेट्स, झहीर-ईशांतच्या खास क्लबमध्ये सामील

Sheikh Hasina : हसीना यांच्या प्रत्यार्पणावरून भारत-बांगलादेश संबंधांत तणाव; जाणून घ्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या धमकीत किती तथ्य?

Umbrj Maruti Temple: उंब्रजचा प्रताप मारुती मंदिर कळसाशिवाय का आहे? जाणून घ्या या मंदिराचा ३७७ वर्षांचा इतिहास

थंडीच्या दिवसांमध्ये फिट राहण्यसाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी आवळ्याचा मुरंबा, नोट करून घ्या रेसिपी