पुणे : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा उपक्रम भाजपचे नगरसेवक राघवेंद्र मानकर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे. सद्गुरू शंकर महाराज यांच्या प्रकटदिनाचे औचित्य साधून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार किलो धान्य आणि २ लाख रुपयांचा सेवानिधी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय मानकर यांनी घेतला. त्यासोबतच दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना मदत व्हावी, या उद्देशाने ५ हजार किलो धान्याचे संकलन केले आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक राघवेंद्र मानकर म्हणाले की, वाढदिवस हा केवळ औपचारिक सोहळा न राहता समाजातील गरजू लोकांच्या उपयोगी पडला पाहिजे. याच विचारातून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचा सेवेचा वसा यापुढेही अविरत सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आणि निष्पाप मृतांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच प्रभागातील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते कै. विजय मरळ यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मदतनिधी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला भाजप नेते प्रदीप कंद, संदीप भोंडवे, नगरसेविका स्वरदा बापट, नगरसेविका स्वप्नाली पंडित, भाजप मंडल सरचिटणीस निलेश कदम, संतोष फडतरे, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, राजाभाऊ कासूर्डे, सुनील देसाई, धनंजय मरळ, सागर दहीभाते, अमर शहा आणि चेतन शहा यांच्यासह प्रभागातील नागरिक, व्यापारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून गरजू शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचा संदेश देण्यात आला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार किलो धान्य आणि २ लाख रुपयांचा सेवानिधी देण्यात आला.
नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्या प्रकटदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ही मदत जमा करण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ५ हजार किलो धान्य आणि २ लाख रुपयांचा सेवानिधी सुपूर्द करण्यात आला.