pcmc News 
पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांना गती; स्थायी समितीच्या बैठकीत विविध प्रस्तावांवर शिक्कामोर्तब

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणाऱ्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Dnyaneshwar more
  • पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांना गती

  • स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावांवर शिक्कामोर्तब

  • पाणीपुरवठा आणि रस्ते सुधारणांवर भर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणाऱ्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात दुपारी २.३० वाजता ही बैठक पार पडली.

पाणीपुरवठा आणि रस्ते सुधारणांवर भर

शहरातील विविध उपनगरांतील नागरी सुविधा सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 'ड' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कावेरी नगर टाकी व बायपास जलक्षेत्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे परिचालन आणि देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. याशिवाय गवळीनगर, दिघी, चऱ्होली, भोसरी, थेरगाव, चिंचेचा मळा, कासारवाडी, रावेत, किवळे आणि मामुर्डी या भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती, ड्रेनेज लाईन व चेंबर्सची कामे तसेच पावसाळी गटारांच्या साफसफाईच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

​स्वच्छता मोहीम आणि ३८ सर्वेक्षणकर्त्यांची नियुक्ती

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची दैनंदिन निगा, नालेसफाई, बांधकामाचा राडारोडा उचलणे आणि अतिक्रमण कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ पुरवण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, त्यांची कुटुंबे, बालके, युवा वर्ग आणि सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३८ सर्वेक्षणकर्त्यांच्या नियुक्तीला कार्योत्तर मान्यता देत, त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

​तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल

तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महापालिकेने स्तुत्य निर्णय घेतला आहे. चिंचवड येथील ६ हजार चौरस मीटर आणि पुनावळे येथील ७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 'ऑक्सिजन पार्क' उद्यानांची केअरटेकरसह देखभाल करण्याची जबाबदारी १८ महिन्यांसाठी त्यांच्याकडे सोपवण्यास मान्यता देण्यात आली.

​अग्निशमन, आरोग्य आणि इतर महत्त्वाचे निर्णय

​अग्निशमन दल सज्ज: अग्निशमन केंद्रांची संवाद यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी व्हीएचएफ आणि पीओसी वॉकीटॉकी पुरवण्यासह वायरलेस यंत्रणेत सुधारणा केली जाणार आहे.

​आरोग्य व इतर सुविधा: वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीतील 'ब्लास्ट फ्रीझर' उपकरणाच्या आठ वर्षांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल करारास (सीएमसी) मंजुरी मिळाली. यासोबतच मोरवाडी आयटीआय इमारतीत लिफ्ट बसवणे आणि विद्युत दाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही मार्गी लागले आहे.

सांस्कृतिक व क्रीडा सोहळे : मोशी खाण परिसर, श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा, महापौर चषक, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीज, ध्वनिक्षेपण, जनरेटर व सीसीटीव्ही यंत्रणा पुरवण्यास तसेच महापालिकेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी फ्लेक्स व बॅनर्स पुरवठा कामाच्या मुदतवाढीस मंजुरी देण्यात आली.

स्थायी समितीच्या बैठकीत कोणत्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली?

शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांचे डांबरीकरण, ड्रेनेज लाईन, पावसाळी गटारांची साफसफाई, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य सुविधांशी संबंधित विविध विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेने कोणता निर्णय घेतला?

चिंचवड येथील ६ हजार चौरस मीटर आणि पुनावळे येथील ७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ऑक्सिजन पार्कची देखभाल करण्याची जबाबदारी तृतीयपंथीयांकडे १८ महिन्यांसाठी सोपवण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

बैठकीत आरोग्य आणि अग्निशमन विभागासाठी कोणते निर्णय घेण्यात आले?

अग्निशमन दलाची वायरलेस संवाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी व्हीएचएफ आणि पीओसी वॉकीटॉकी पुरवण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीच्या ब्लास्ट फ्रीझर उपकरणाच्या आठ वर्षांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल करार मंजूर करण्यात आला.

भारतात सुरू होणार Apple चे सातवे अधिकृत रिटेल स्टोअर, कंपनीने केली या शहराची निवड

इन्स्टाग्रामवर मैत्री, गणपती दर्शनाच्या बहाण्याने तरुणीला बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Alpana art: अल्पना आर्टचा वाढतोय ट्रेंड! जाणून घ्या बंगालच्या या पारंपरिक कलेचे महत्त्व आणि खास वैशिष्ट्ये

अमरावती विमानतळावरून रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा; आता केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

Israel : इस्रायलमध्ये सत्तांतराची नांदी! आयझेनकोट आणि गोलान यांच्यात युती; अरब पक्ष 'रा'आम'ही सरकारमध्ये सामील होणार?