amol balwadkar 
पुणे

बालेवाडी-वाकड जोडरस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न तातडीने सोडवा; नगरसेवक अमोल बालवडकरांची आयुक्तांकडे मागणी

पुणे शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली.

Dnyaneshwar more

पुणे : पुणे शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी बालेवाडी-वाकड जोडरस्त्याचे रखडलेले काम आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीमच्या अंमलबजावणीचा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करत या दोन्ही कामांना तातडीने गती देण्याची मागणी त्यांनी केली.

बालेवाडी-वाकड जोडरस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी आग्रही भूमिका अमोल बालवडकर यांनी आयुक्तांसमोर मांडली. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे भूसंपादनातील अडथळे दूर करून काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.

तसेच म्हाळुंगे टी.पी. स्कीमच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडचणी दूर करून पुढील आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या योजनेला गती मिळाल्यास परिसराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या बैठकीत पुणे शहरातील विविध विकासकामांचा आढावा, प्रलंबित प्रश्न आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना अमोल बालवडकर म्हणाले, "पुण्याचा विकास केवळ घोषणांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित रस्ते, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकासाचे प्रश्न वेळेत मार्गी लागणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील."

अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्तांची भेट का घेतली?

पुणे शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना गती देण्यासाठी त्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली.

बालेवाडी-वाकड जोडरस्त्याबाबत कोणती मागणी करण्यात आली?

जोडरस्त्यासाठी आवश्यक असलेली उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली.

म्हाळुंगे टी.पी. स्कीमबाबत काय मागणी करण्यात आली?

म्हाळुंगे टी.पी. स्कीमच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडथळे दूर करून पुढील आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी अमोल बालवडकर यांनी केली.

Nagpur News : १४ वर्षीय मुलीचे कारमधून अपहरण; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अपहरणासाठी वापरलेले वाहन सोडले

Mumbai travel: मुंबईतील प्रसिद्ध संग्रहालयांना भेट दिलीय का? इतिहास, कला आणि विज्ञानाचा अनोखा अनुभव देणारी ८ ठिकाणे!

Job Interview Tips: जॉब इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा? पगार, कमतरता आणि जुन्या नोकरीबद्दल बोलताना टाळा 'या' चुका

Green Tea Side Effects: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिता? मग 'हे' दुष्परिणामही जाणून घ्या!

Mohammed Shami : मोहम्मद शमीनं घेतली भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण! क्रीडा विकासावर झाली चर्चा