एनडीएच्या १५१व्या बॅचचा-दीक्षांत सोहळा पार पडला (फोटो - टीम नवराष्ट्र)  
पुणे

NDA Convocation Ceremony : "आधुनिक युद्धात तंत्रज्ञान महत्त्वाचे ..", डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती यांचे प्रतिपादन

एनडीएच्या १५१ व्या तुकडीतील ३६४ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १४ महिला कॅडेट्सचा समावेश असून, आधुनिक युद्धातील तंत्रज्ञान आणि मानवी निर्णयक्षमतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

प्रीति माने
  • एनडीएच्या १५१ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

  • कुलगुरू डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती यांच्या हस्ते पदवी वितरण

  • भविष्यातील लष्करी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे आवाहन

NDA Convocation Ceremony 2026 : सुनयना सोनावणे : पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर युद्ध, स्वायत्त प्रणाली आणि अंतराळ तंत्रज्ञानामुळे आधुनिक युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी भविष्यातील लष्करी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. मात्र, तंत्रज्ञान हे मानवी निर्णयक्षमतेला पूरक असले पाहिजे, पर्याय नव्हे. दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता, व्यावसायिक कौशल्य आणि सचोटी हेच प्रभावी लष्करी नेतृत्वाचे खरे गुण आहेत, असे प्रतिपादन संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी), पुणेचे कुलगुरू डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती यांनी केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५१ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ हबीबुल्लाह सभागृहात पार पडला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) मान्यतेने ३६४ कॅडेट्सना पदवी आणि अभ्यासक्रम पूर्णत्वाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये १४ महिला कॅडेट्सचा समावेश आहे. डॉ. नारायण मूर्ती यांच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आले. यावेळी एनडीएचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी, उपकमांडंट रिअर ॲडमिरल बी. एस. बैन्स, प्राचार्य विनय दीप यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक आणि पालक उपस्थित होते.

एनडीएमधील प्रशिक्षण केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून शारीरिक क्षमता, मानसिक कणखरपणा, नेतृत्व आणि निर्णयक्षमता विकसित करणारे आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कॅडेट्सना एकत्र प्रशिक्षण दिल्यामुळे संयुक्त कार्यपद्धती, परस्पर विश्वास आणि समन्वयाची भावना निर्माण होते. भविष्यातील संयुक्त लष्करी मोहिमांसाठी ही जडणघडण महत्त्वाची असल्याचे मूर्ती यांनी सांगितले.

प्राचार्य विनय दीप यांनी तुकडीच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेतला. सुमारे ८७ टक्के बीए, बीएस्सी आणि बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) कॅडेट्सनी, तर ७६ टक्के बीटेक कॅडेट्सनी ५.५ ते ७.५ दरम्यान सीजीपीए मिळवला. बीएस्सीमध्ये आयुष कुमार, बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) मध्ये गार्गी पालीवाल, बीए (सोशल सायन्स) मध्ये दिव्या गोदारा आणि बीटेकमध्ये प्रशांत कुमार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना कमांडंट सिल्व्हर मेडल आणि संबंधित सेवांच्या प्रमुखांच्या ट्रॉफीने गौरविण्यात आले. बांगलादेशचा मोहम्मद जाहिरुल बिलाल याची सर्वोत्कृष्ट परदेशी कॅडेट म्हणून निवड झाली. समारंभाला १८ परदेशी कॅडेट्स उपस्थित होते. त्यापैकी सहा जणांना अभ्यासक्रम पूर्णत्वाची प्रमाणपत्रे देण्यात आली.

डीआयएटीचे कुलगुरू डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती म्हणाले, "आधुनिक युद्धात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर युद्ध आणि स्वायत्त प्रणालींचे महत्त्व वाढत आहे. मात्र, तंत्रज्ञान हे मानवी निर्णयक्षमतेचा पर्याय नाही. परिस्थितीचे आकलन करून दबावाखाली निर्णय घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे हे लष्करी नेतृत्वाचे महत्त्वाचे गुण आहेत."

शाखानिहाय पदवी वितरण

  • पदवी - कॅडेट्स

  • बीए - ५८

  • बीएस्सी - ७७

  • बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) - ९५

  • बीटेक - १३४

  • एकूण - ३६४

Government Inflation Report : महागाईच्या अहवालात धक्कादायक खुलासा! भाजीपाला-धान्य पुन्हा महागणार? तुमच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडणार का?

Laptop Tricks: लॅपटॉपचा कीबोर्ड खराब झाला तरी नो टेन्शन; कीबोर्डशिवायही करता येईल टायपिंग; जाणून घ्या ट्रिक

Shooting Competition: पुण्यात नेमबाजीचा महाकुंभ! ७५०० नेमबाजांचा सहभाग

Infinix Hot 30i Launched: कमी किंमत, जबरदस्त बॅटरी! फक्त 9 हजारांच्या आतला 'हा' फोन ठरतोय बजेट किंग

Maruti DDiS 1.3 Engine: डीजल कारचा तो काळ संपला! BS6 नियम आणि वाढत्या किमतींमुळे मारुतीचे 'हे' इंजिन का झाले इतिहासजमा?