काळ बदलला, वाहनं आली; तरीही शेतकऱ्यांसाठी बैलगाडी फायदेशीर 
रायगड

Raigad News: काळ बदलला, वाहनं आली; तरीही शेतकऱ्यांसाठी बैलगाडी फायदेशीर... ग्रामीण भागात पारंपरिक साधनांना महत्त्व

ग्रामीण भागात आजही शेतकरी बैलगाडीला पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे इंधनाचा खर्च आणि वाहनभाडे टाळली जाते. शेतीच्या विविध कामांसाठी शेतकऱ्यांना बैलगाडीचा आधार आहे.

हर्षदा जाधव
  • पेंढा सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

  • पेंढा वाहतुकीपासून शेतीच्या विविध कामांपर्यंत बैलगाडीचा मोठा आधार

  • पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याने शेतकऱ्याऱ्यांच्या अडचणीत भर

रसायनी: भातशेतीची कापणी पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आता भाताच्या मळणीची लगबग सुरू झाली आहे. अनेक शेतकरी शेतात मळणी उभारून वेळ मिळेल त्याप्रमाणे भाताची झोडणी करीत आहेत. या प्रक्रियेतून मिळणारा पेंढा सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पेंढ्याची वाहतूक वाहनांमधून केल्यास मोठा खर्च येतो. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची बैलगाडी आहे, त्यांच्यासाठी पेंढा वाहतुकीपासून शेतीच्या विविध कामांपर्यंत बैलगाडीचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आजही बैलगाडीचे महत्त्व कायम असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतीबरोबरच पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते. ग्रामीण भागात काही महिन्यांनंतर जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनतो. पावसाळ्यात जंगल आणि मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवते; मात्र उन्हाळ्यात हे गवत सुकून जाते. त्यातच उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक होते. परिणामी जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनते. त्यामुळे आतापासूनच वैरण साठवून ठेवण्याची लगबग सुरू झाली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

शेतकऱ्यांच्या संसाराला पशुधनाचा मोठा हातभार लागत असतो. गाय, म्हैस आणि बैल ही केवळ पाळीव जनावरे नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधार आहेत. पूर्वी शेतात किंवा मोकळ्या मैदानात जनावरे चरायला सोडल्यास त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सहज मार्गी लागत होता. मात्र, सध्या औद्योगिकीकरण, जंगलतोड, माती उत्खनन आणि वाढते वणवे यांमुळे नैसर्गिक चाऱ्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यातच पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याने शेतकऱ्याऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

बैलगाडीचे महत्त्व आजही

उन्हाळ्याच्या दिवसांत शेतकऱ्यांचा बराचसा वेळ शेतीच्या कामांपेक्षा जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यामध्ये जात आहे. दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे जनावरांच्या खाद्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गाय, म्हैस आणि बैल यांसारखे पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस खर्चिक आणि कष्टाचे ठरत आहे. अशा परिस्थितीत बैलगाडीचा वापर शेतकऱ्यासाठी आजही उपयुक्त ठरत आहे. शेतातून पेंढा आणणे, वैरण वाहून नेणे, शेतीसाठी लागणारे साहित्य ने-आण करणे तसेच ग्रामीण भागातील दैनंदिन दळणवळणासाठी बैलगाडीचा वापर केला जात आहे. इंधनाचा खर्च आणि वाहनभाडे टाळण्याबरोबरच शेतीच्या कामांमध्ये बैलगाडीमुळे आर्थिक बचत होत असल्याने ग्रामीण जीवनात बैलगाडीचे महत्व आजही टिकून आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गट 'क' परीक्षेचा अर्ज भरण्यास 'या' तारखेपर्यंत मुदत

चुलत दीर आणि भावजयी बेपत्ता झाले अन् दुसऱ्याच सकाळी शेतातील स्टोअर रूममध्ये...

बिजवाई सोयाबीनला ८ हजारावर भाव! चार वर्षांनंतर सोयाबीनला सोन्याची झळाळी; शेतकऱ्यांना दिलासा

Iran : इराणची युद्धनीती जगात भारी! अमेरिकेला मात देण्यासाठी वापरले इलॉन मस्कचेच तंत्रज्ञान; स्टारलिंकचा वापर करून उडवले US Air Base

म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय