महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाचा दुजाभाव! शिंदे सरकार झालं लाडकं आता शिवसेना झाली दोडकी

Shiv Sena Petition​ : सर्वोच्च न्यायालयाने आपला दुजाभाव दाखवत शिंदे सरकारला दिलासा तर शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे.

Vivek Bhor

मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिवसेनेच्या याचिकेवर (Shiv Sena Petition) तातडीच्या सुनावणीस (Denied An Urgent Hearing) नकार दिला आहे. ही सुनावणी आता ११ जुलैलाच होईल. तसेच बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी (Shivsena Demands Postpone Floor Test) शिवसेनेने केली होती. मात्र, न्यायालयाने याबाबत काहीही सांगितले नाही. त्यामुळे शिवसेनेला अद्याप तरी दिलासा मिळालेला नाही.

एकनाथ शिंदे सरकार विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित असताना नव्या सरकारची बहुमत चाचणी न घेण्याची मागणी याचिकेतून शिवसेनेने केली आहे.

नव्या याचिकेत ३९ बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस न्यायालयाने नकार दिला आहे. त्याचवेळी आता ११ जुलैला शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होईल, असे सांगण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी शपथ घेतली. तर नवीन सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसात होणार आहे. या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून १६ आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

त्यांच्या अपात्रतेवर अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी करत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सभागृहातून निलंबित करण्याची आणि त्यांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत त्यांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून किंवा कामकाजात सहभाग घेण्यापासून रोखण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट

NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठी खांदेपालट, दोन महिला नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

अल निनोचा धोका, दुष्काळाचे संकट! बदलत्या हवामानानुसार शेतीचे नियोजन करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधवांचे आवाहन

शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट! महामार्गावर गस्त अन् विशेष उपाययोजना, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन