महाराष्ट्र

बंडखोरांना शिवसैनिकांसह जनतेचा तळतळाट लागेल!

-शिवसेना महिला आघाडीच्या लतिका पाष्टे यांचा इशारा ; वडगावात निष्ठावंत शिवसैनिकांची एकजूट

Aparna

वडगाव मावळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायद घेऊन त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या घटनेने शिवसैनिकांसह राज्यातील जनतेला दुःख झाले आहे. त्यामुळे या बंडखोर आमदार आणि खासदारांना शिवसैनिकांसह सर्वसामान्य जनतेचा तळतळाट लागल्याशिवाय राहाणार नाही. निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेले आमदार, खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान शिवसेना महिला आघाडी मावळ तालुका संपर्क संघटिका लतिका पाष्टे यांनी केले. तसेच बैठक बोलावली असतानाही मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती लावल्याने या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

मावळ तालुका निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक वडगाव मावळ येथील द्वारकाधीश मंगल कार्यालयात सोमवारी (दि. २५ ) घेण्यात आली. त्यावेळी लतिका पाष्टे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या बैठकीला शिवसेनेचे भारत ठाकूर, शांताराम भोते, अनिकेत घुले, शादान चौधरी, रमेश जाधव, अनिल ओव्हाळ, मदन शेडगे, अमित कुंभार, राहुल नखाते, राम सावंत, विकेश मुथा, शैला खंडागळे, भरत नायडू, विशाल दांगट, देवा कांबळे, मेहरबान सिंग आदींसह मावळातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार

मावळ तालुक्यातील काही पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला कोणताही धक्का बसला नाही. या उलट बैठकीची गर्दी पाहता मावळ शिवसेनेला नवी संजीवनी मिळाली. या पुढे कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. गेले ते कावळे, राहिले ते मावळे. आमच्या हातात शिवबंधन, पुन्हा शिवसेना उभी करू, असा शब्द शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर तीव्र नाराजी व्यक्त करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!