महाराष्ट्र

विशाल अग्रवाल यांच्यावर कोर्ट परिसरातच शाईफेकीचा प्रयत्न; विरोधात घोषणाबाजीही

विशाल अगरवाल याला आज पुण्यातील न्यायालयात हजर केले जात असतानाच त्याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला. याचदरम्यान त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या शाईफेकीचा प्रयत्न वंदे मातरम् या संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे.

कृपादान आवळे

पुणे : कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघातातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर केले जात असतानाच काहींनी त्याच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.

पोर्शे कारने जोरदार धडक दिल्यानंतर दोन तरुण-तरुणीचा जागेवर मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला एक दिवसाच्या आतच जामीन मिळाला होता. त्यामुळे याचीच चर्चा संपूर्ण राज्यभर सुरु होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले.

दरम्यान, विशाल अगरवाल याला आज पुण्यातील न्यायालयात हजर केले जात असतानाच त्याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला. याचदरम्यान त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या शाईफेकीचा प्रयत्न वंदे मातरम् या संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. तसेच त्यांच्याकडून विरोधात घोषणाबाजीही केली गेली.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!