Dattatray Bharane on Washim Water Scarcity 
वाशिम

वाशिममध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, जलसंधारण कामांना गती द्या; पाणीटंचाईवर पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

Dattatray Bharane on Washim Water Scarcity: वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाची कामे व्यापकपणे राबवून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

Priyanka Mundinkeri
  • वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी मोठी तयारी

  • जलसंधारणासाठी पालकमंत्री मैदानात

  • १५ डिसेंबरपूर्वी कामे पूर्ण करण्याचे भरणेंचे निर्देश

वाशिम: पेयजलाची उपलब्धता हे शासनाचे प्राधान्य असून, त्यादृष्टीने नियोजन व्हावे. जिल्ह्यात सर्वत्र जलसंधारण कामे व्यापकपणे राबवावीत. टंचाईशी संबंधित कामे गुणवत्तापूर्ण व १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दिले.जिल्हा नियोजन समितीची बैठक, तसेच दुष्काळ निवारण सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

खा. संजय देशमुख, आ. श्याम खोडे, आ. भावना गवळी, आ. सई डहाके, आ. अमित झनक, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, दुष्काळाचे वर्ष असल्याने पेयजलाचे स्रोत वाचवणे व सर्वत्र पाण्याची उपलब्धता ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे परिपूर्ण नियोजन करावे. तसेच, लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कामांना गती द्यावी. तसेच, सार्वजनिक कामांवर भर द्यावा. याशिवाय, व्हीबी जी राम जी योजनेतून भरीव रोजगारनिर्मिती व्हावी. शेतकरी बांधवांना पीक कर्ज उपलब्धता करुन द्यावी तसेच विविध योजनांतून आवश्यक मदत वेळेत करावी. ज्या पीक विमा कंपनीबाबत तक्रारी आहेत. त्यांचे निराकरण करून शेतकरी बांधवांना भरपाई देण्यात यावी. जलाशयांतून अनधिकृत उपसा रोखण्यासाठी पथकांनी सजगता बाळगावी. अवैध उपसा सिंचनाबाबत जारी आदेशांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले.

शहराची आणि गावाची क्षमतेची गरज लक्षात घेऊन विहीर अधिग्रहण करावे. या संदर्भात शासनस्तरावर लवकरच बैठक होणार आहे. वाशिम आकांक्षित जिल्हा आहे. जास्तीत जास्त जलसंधारण कामे राबविण्यासाठी शासन स्तरावर, तसेच नीती आयोगाकडेही याबाबतचे प्रस्ताव द्यावेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातूनही कामांना चालना देण्यात यावी. दुष्काळात जिल्ह्यातील पशुधनाची आवश्यकता लक्षात घेऊन चारासाठा उपलब्धता ठेवावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

मांडलेल्या अडचणींचे तत्काळ निराकरण करा

सर्वसाधारण योजनेत ३४१ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत ७६ कोटी व आदिवासी उपयोजनेत १५ कोटी ८ लाख रुपये मंजूर नियतव्यय आहे. सर्वसाधारण योजनेत १९० कोटी ६४ लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेत २२ कोटी १८ लाख रुपये व आदिवासी उपयोजनेत ७ कोटी ५१ लाख रुपये आदी प्रशासकीय मान्यता झाल्या असून, इतरही मान्यतांची कार्यवाही सुरू आहे.

तांत्रिक व प्रशासकीय मान्यता तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्ह्यातील नगरपरिषद अध्यक्ष, समिती सदस्यानी माडलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले, उपलब्ध पाणीस्रोत, प्रत्यक्ष पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, अपूर्ण योजना, सुरू असलेली कामे आवश्यक अतिरिक्त निधी, नवीन कामे आदींचा आढावा घेण्यात आला.

Public Sector Banks Risk : शेतकऱ्यांसाठीचं लोन बनलं मोठं टेन्शन? सरकारी बँकांवर कोणतं मोठं सावट? नेमकं काय घडतंय?

कार खरेदी करायला शोरूममध्ये जाताय? Amazon Autoz सेवेबद्दल जाणून घ्या, 2027 पासून...

Pratap Sarnaik: एसटी बसस्थानकांतील अस्वच्छतेवर मंत्र्यांचा संताप; ठाण्यातील तीन बसस्थानकांमध्ये प्रताप सरनाईक यांची पाहणी

मुंबईत ‘MIECA 2026’चे चौथे पर्व दिमाखात संपन्न; शिक्षण-उद्योगातील २०० मान्यवर व संस्थांचा सन्मान

'जडेजा जबरदस्त ऑलराउंडर, पण...' चार वेगवान गोलंदाजांच्या प्लॅनवर बहुतुलेंनी सांगितली Team India ची इनसाइड स्टोरी